Nashik News: ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक (Nashik) जिल्ह्याला दि. 17 ऑक्टोबर रोजी गौरविण्यात आले. हा सन्मान महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (President Draupadi Murmu) यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली (New Delhi) येथील विज्ञान भवन येथे प्रदान करण्यात आला. आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय यश संपादन केले असून, या सामूहिक प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला आहे.

Continues below advertisement

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी नाशिक जिल्ह्याचा सन्मान स्वीकारला. यावेळी प्रकल्प अधिकारी (नाशिक) अर्पिता ठुबे, प्रकल्प अधिकारी (कळवण) ए. के. नरेश, सहायक प्रकल्प अधिकारी हर्षवर्धन नाईक आणि जिल्हा व्यवस्थापक (पेसा) राकेश वाघ उपस्थित होते.

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रापंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी केलेल्या विशेष कामगिरीबरोबरच सर्व तालुकास्तरीय गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पं) तसेच ASSK, RGSA आणि PESA टीम यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले. यासोबतच जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रापंचायत प्रतिनिधी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करण्यात आली तसेच सरपंच व ग्रामपंचायत प्रतिनिधींचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

Continues below advertisement

Omkar Pawar: नाशिक जिप सीईओंची प्रतिक्रिया

“हा सन्मान नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या एकत्रित आणि प्रामाणिक प्रयत्नांचा परिणाम आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन व ग्रामपंचायत यांनी एकसंघपणे कार्य केल्यानेच हा राष्ट्रीय दर्जाचा सन्मान मिळवता आला. आदीकर्मयोगी अभियानाच्या माध्यमातून पेसा क्षेत्रातील ग्रामविकासात नावीन्य, पारदर्शकता जनसहभाग यांचा नवा आदर्श नाशिक जिल्ह्याने घालून दिला आहे,” असे नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी म्हटले आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Tejas MK1A: शत्रूची आता खैर नाही! नाशिकमधून झेपावलं स्वदेशी तेजस एमके 1A लढाऊ विमान; HAL ची ऐतिहासिक कामगिरी

Election Commission: मनसे, मविआच्या मागणीला पहिलं यश; मतदार यादीतील घोळ तपासा, निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश