नाशिक: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये तेरा वर्षीय अल्पवयीन मुलावर दोघां अल्पवयीनकडून लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या शालिमार परिसरातील ही धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघां अल्पवयीन विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलावर वैद्यकीय उपचार करून प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोन दिवसांपूर्वीची घडलेली घटना उघडकीस आली आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिक शहरातील शालिमार परिसरातील ही धक्कादायक घटना घडली आहे. तेरा वर्षीय अल्पवयीन मुलावर दोघांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. लैंगिक अत्याचार करणारे देखील पंधरा ते सतरा वर्षीय अल्पवयीन असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दोन दिवसांपूर्वी दुकानात आईने सांगितलेले वस्तू सायकलवर घेऊन जात असताना दोघांनी तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाला मोकळ्या जागेत नेत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अत्याचार झालेल्या मुलावर वैद्यकीय उपचार करून त्याची प्रकृती स्थिर असल्यास देखील पोलिसांनी सांगितलं आहे. अत्याचार करणाऱ्या दोघांची ओळख पटली असून लवकरच संशयितांना ताब्यात घेणार असल्याचं भद्रकाली पोलिसांनी सांगितलं आहे.
या घटनेसंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी दुकानात आईने सांगितलेले वस्तू सायकलवर घेऊन जात असताना दोघांनी तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाला मोकळ्या जागेत नेत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिकच्या शालिमार परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघां अल्पवयीन विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलावर वैद्यकीय उपचार करून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पीडित मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोन दिवसांपूर्वीची घडलेली घटना उघडकीस आली आहे.