Nashik Crime : रील बनवण्यासाठी महागड्या गाड्या चोरल्या, पोलिसांना 9 लाखांच्या फॅन्सी टू व्हिलर सापडल्या, मुलालाही उचललं
Nashik Crime : महागड्या गाड्या चक्क सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी चोरल्याचं उघड झालंय..

Nashik Crime : नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी शिर्डी येथून महागड्या दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांना ताब्यात घेतलंय. आतापर्यंत पोलिसांनी अनेक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करताना अनेकांना ताब्यात घेतलं. यावेळी अनेकांचे चोरीचे उद्देश वेगवेगळे असायचे. काहींचे उपजीविकेचे तर काहींचे मौजमजेसाठी असायचे. मात्र नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरांनी महागड्या गाड्या चक्क सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी चोरल्याचं उघड झालंय...त्यामुळे पोलीस देखील हैराण झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.
न्यायालयाकडून चोरट्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
अधिकची माहिती अशी की, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत दोन दुचाकी चोरी गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यावरून पोलिसांनी तपास करत शिर्डी येथून चार जणांना ताब्यात घेतलंय. त्यात दोन जण विधी संघर्षित निघाले आहेत. या चोरांकडून पोलिसांनी तब्बल नऊ लाख रुपये किमतीच्या महागड्या गाड्यात जप्त केल्यात... यातील दोन गाड्या नाशिकच्या तर तीन गाड्या संगमनेर येथील असल्याचे उघड झाले आहे. या चोरांनी आणखी किती गाड्या चोरल्या त्याच्या तपासासाठी न्यायालयाकडून पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील घेतली आहे.
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरणhttps://t.co/grcEJWKh2q
— ABP माझा (@abpmajhatv) January 30, 2025
9 लाखांच्या महागड्या गाड्या चोरल्या
- रिल्स बनवण्यासाठी चोरायचे महागड्या गाड्या
- नाशिक पोलिसांनी शिर्डी येथील चोरट्यांना घेतले ताब्यात
- दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करत असताना कारण आले समोर
- रील बनवण्यासाठी चोरल्यात तब्बल नऊ लाख रुपयांच्या गाड्या
- नाशिक शहरातील दोन तर संगमनेर मधील तीन गाड्या पोलिसांनी घेतल्या ताब्यात
- नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्हातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
- दोन दुचाकी चोरट्यांसह दोन विधी संघर्षित बालक पोलिसांच्या ताब्यात
- नऊ लाख रुपयांच्या पाच महागड्या दुचाकी पोलिसांनी केल्या हस्तगत..
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखलhttps://t.co/3bgARZkiCm
— ABP माझा (@abpmajhatv) January 30, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
