Nashik Crime : साखरपुड्याच्या कार्यक्रमात नियोजित वधूने तिच्या प्रियकराला मिठी मारल्यानंतर प्रेमप्रकरण उघडकीस आल्यानंतर वराने लग्नाला नकार दिला. त्यामुळे हुंडा प्रकरणात अडकविण्याची धमकी देत वधूने ब्लॅकमेल केल्यामुळे नाशिकमध्ये कार्यरत आयकर अधिकारी असलेल्या नवरदेवान गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. काल (दि.१८) हा विवाह होणार होता. मात्र, विवाहापूर्वीच वराने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने वधूसह तिचा प्रियकर आणि अन्य एका संशयिताविरोधात संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime News)
बुरकुले मंगल कार्यालयाजवळील इन्कम टॅक्स कॉलनीत हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरेराम पाण्डेय (रा. देवरिया, उत्तर प्रदेश) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ हरेकृष्ण पाण्डेय याचा वाराणसी येथील मोहिनी नामक मुलीशी साखरपुडा झाला होता. या कार्यक्रमात तिने तिचा प्रियकर सुरेश पाण्डेय याला मिठी मारली होती. त्यानंतर तिचे प्रेमसंबंध हरेकृष्णला कळले.
होणारा नवरा मानसिक तणावात गेला
त्याने तू त्याला सोडून दे तरच मी लग्न करेल असे त्यांनी सांगितले. मात्र तिने मी त्याला सोडणार नाही. मात्र तू जर माझ्यासोबत लग्र केले नाही तर तुझ्यासह कुटुंबीयांवर हुंडा मागितल्याची तक्रार दाखल करेल. अशी धमकी दिली होती. यामुळे हरेकृष्ण वैफल्यग्रस्त झाला होता. त्यातून त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
आयुष्य संपवण्याचा पर्याय का निवडला?
दरम्यान, आयकर अधिकारी असलेल्या हरेकृष्ण पाण्डेय यांनी नियोजित वधूकडून, लग्न कर, नाही तर खोट्या पोलिस केसमध्ये अडकवण्याची सातत्याने धमक्या दिल्याने टोकाचे पाऊल उचलल्यानंतर अंबड पोलिसांत मोहिनी पांडे, तिचा प्रियकर सुरेश पांडे आणि त्याचा साथीदार मुनेंद्र पांडे या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे तिघेही फरार झाले आहेत. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. हरेकृष्ण पाण्डेय यांचा शुक्रवारी १८ एप्रिल रोजी वाराणसी येथे विवाह होणार होता. मात्र, लग्न होण्यापूर्वीच त्यांनी आपली जीवन यात्रा संपवल्याने इन्कमटॅक्स विभागात हळहळ व्यक्त होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
