एक्स्प्लोर

Nashik Car Fire: भाजप खासदाराच्या धावत्या कारने अचानक घेतला पेट, 4 कोटींच्या आलिशान रेंज रोव्हरचा अक्षरशः कोळसा; मुंबई-नाशिक महामार्गावरील थरारक घटना

Nashik Car Fire: मुंबई–नाशिक महामार्गावर भाजप खासदारांच्या आलिशान रेंज रोव्हर कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.

Nashik Car Fire: मुंबई–नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) शुक्रवारी मध्यरात्री एक थरारक आणि खळबळजनक घटना घडली. राजस्थानमधील (Rajasthan) जालोर–सिरोही मतदारसंघाचे भाजप खासदार लुंबा रामजी चौधरी (BJP MP Lumba Ramji Chaudhary) यांच्या आलिशान रेंज रोव्हर कारला (Range Rover car) अचानक भीषण आग लागली. ही आग इतकी तीव्र होती की सुमारे चार कोटी रुपये किमतीची कार पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी अक्षरशः गाडीचा सांगाडाच उरला होता.

ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याने तात्काळ मदत मिळण्यास विलंब झाला. दरम्यान, या भीषण घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामधून आगीची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे.

Nashik Car Fire: नेमकं काय घडलं?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खासदार लुंबा रामजी चौधरी हे वाशिम येथील दौरा आटोपून महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे दर्शनासाठी जात होते. त्यांच्यासोबत काही सहकारी कारमध्ये उपस्थित होते. कार शहापूर येथील चालक अनिल बबन जाधव (वय 40) चालवत होते. कार नाशिकजवळील गोंदे फाटा परिसरात आली असताना, चालकाला अचानक गाडीतून जळाल्यासारखा उग्र वास येऊ लागला. काही क्षणांतच इंजिनमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत चालक जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता कार रस्त्याच्या कडेला उभी केली.

Nashik Car Fire: आगीने केले रौद्र रूप धारण 

धूर वाढत असल्याचे पाहताच चालक अनिल जाधव यांनी तातडीने खासदार चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गाडीतून बाहेर उतरण्याचे आवाहन केले. सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरताच काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण कारला विळखा घातला. मुंबई–नाशिक महामार्गावर धावत्या कारला आग लागल्याने काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी सुरक्षित अंतर ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवले.

Nashik Car Fire: चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब असली तरी खासदारांची कोट्यवधींची आलिशान रेंज रोव्हर अक्षरशः कोळसा झाली आहे. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत गाडीचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून, या घटनेमुळे महामार्गावरील वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आणखी वाचा 

Tejas Thackeray Hospitalized: मोठी बातमी: तेजस ठाकरेंची तब्येत बिघडली; मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Gas Shortage: गॅस टंचाईने नाशिकमधील उद्योग अडचणीत; 100 हून अधिक कंपन्यांकडे फक्त एक दिवसाचा साठा, कंपन्या बंद ठेवण्याची वेळ
गॅस टंचाईने नाशिकमधील उद्योग अडचणीत; 100 हून अधिक कंपन्यांकडे फक्त एक दिवसाचा साठा, कंपन्या बंद ठेवण्याची वेळ
Nashik Mhada Fraud: नाशिकमध्ये मोठा घोटाळा उघड, गरिबांच्या घरांवर धनदांडग्या बिल्डरांकडून डल्ला; 49 प्रकरणांमध्ये 'म्हाडा'ची फसवणूक, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये मोठा घोटाळा उघड, गरिबांच्या घरांवर धनदांडग्या बिल्डरांकडून डल्ला; 49 प्रकरणांमध्ये 'म्हाडा'ची फसवणूक, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: खिडकीला दोर बांधून कोणी फास लावेल का? डॉ. मनीषा जेजुरकरांच्या बहिणीचा सवाल, निलेश जेजुरकरांशी अफेअर असणारी महिला डॉक्टर गोत्यात येणार
खिडकीला दोर बांधून कोणी फास लावेल का? डॉ. मनीषा जेजुरकरांच्या बहिणीचा सवाल, निलेश जेजुरकरांशी अफेअर असणारी महिला डॉक्टर गोत्यात येणार
Nashik Rangpanchami 2026: नाशिकमध्ये रंगपंचमी साजरी करताना हुल्लडबाजांचा उन्माद, गोदावरी नदीपात्रात चपला-बूटं फेकली; गोदाप्रेमी आक्रमक, प्रशासनाकडे मोठी मागणी
नाशिकमध्ये रंगपंचमी साजरी करताना हुल्लडबाजांचा उन्माद, गोदावरी नदीपात्रात चपला-बूटं फेकली; गोदाप्रेमी आक्रमक, प्रशासनाकडे मोठी मागणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Amol Mitkari: 'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
Embed widget