Nashik Accident News : नाशिक–त्र्यंबकेश्वर मार्गावर भीषणअपघाताचीघटनाघडलीआहे. भरधाव वेगात असलेला दगडांनी भरलेला टिप्पर उलटल्याने बुलढाणा जिल्ह्यातील दोन तरुण पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला. आज (4 जानेवारी) दुपारच्यासुमारासहा भीषण अपघात झाला. दरम्यानहा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्रयाघटनेनेपरिसरातएकचखळबळउडालीआहे.

Nashik Accident : त्र्यंबकेश्वरहुन गावी परतणाऱ्या दोन तरुण भाविकांवर काळाचा घाला, दोघांचाही जागीच मृत्यू 

मिळालेल्यामाहितीनुसार, त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन दुचाकीवरून परतत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. शिवम राजेश उबेरहांडे (22, रा. पांगरी उबेरहांडे, जि. बुलढाणा) आणि भूमिका समाधान खेडेकर (21, रा. अंतरी खेडेकर, जि. बुलढाणा) अशी मृतांची नावे आहेत. ते एमएच 15 एवाय 65 क्रमांकाच्या दुचाकीवर होते. त्र्यंबकेश्वर गेस्टहाऊसजवळ उतारावरून येणारा टिप्पर समोरून चुकीच्या बाजूने येणाऱ्या सिलिंडरने भरलेल्या ‘छोटा हत्ती’ टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक लावल्याने उलटला. टिप्परमधील दगड दुचाकीस्वारांवर कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या मदतीने टिपर बाजूला करण्यात आला. सध्या पंचनामा पूर्ण करण्यात आला असून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे भरधाव वेग आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवण्याचे धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत.

सीएनजी सिलेंडरने भरलेला ट्रेलर उलटला; गोंदिया-कोहमारा महामार्गावरील घटना

सीएनजी सिलेंडर भरलेले ट्रेलर रस्त्याच्या मधोमध उलटून सिलिंडर मधून गॅस लिक झाल्याची घटना गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय राज्य महामार्गावरील मुरदोली जंगल शिवारातील वाघदेव देवस्थान परिसरात घडली. रिलायन्स कंपनीचे सीएनजी सिलेंडर गोंदिया येथे रिकामे करून रिकामे सिलेंडर ट्रेलर मध्ये कोहमारा मार्गे नागपूरकडे घेऊन जात असताना गोंदिया -कोहमारा मार्गावरील मुरदोली जंगल शिवारात वाघदेव देवस्थान परिसरात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. यावेळी अनियंत्रित ट्रेलर रस्त्याच्या मधोमध उलटले. त्यामुळे ट्रेलर मध्ये ठेवलेला एक सिलेंडर लीक झाला. सुदैवाने सिलेंडरध्ये थोडीफार सीएनजी असल्याने मोठा अपघात टळला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून ट्रेलर रस्त्याच्या मधोमध उलटल्याने काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती