Nashik Accident News: आजीच्या डोळ्यादेखत आठ वर्षीय चिमुरडीचा ट्रकखाली चिरडून जीव गेला; नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik Accident News: नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. आता पुन्हा एकदा शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे.

Nashik Accident News: नाशिक शहरात अपघातांच्या (Nashik Accident) वाढत्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी (दि. ११) सकाळी, पाइपलाइन रोडवरील रिलायन्स जिओ पेट्रोलपंपासमोर एक हृदयद्रावक अपघात घडला. दुचाकीवरून आजीसोबत जात असलेल्या आठ वर्षांच्या नेविका नेरकर या चिमुरडीचा, भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.
Nashik Accident News: धडकेनंतर ट्रकचे चाक गेलं थेट डोक्यावरून
सकाळच्या वेळेत, औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या पाइपलाइन रोडवर मृत नेविका नेरकर आपल्या आजीसोबत दुचाकीवरून घरी जात होती. दरम्यान, मागून येणाऱ्या बारा चाकी टाटा ट्रक (क्रमांक MH-17-BD-5005) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे नेविका रस्त्यावर पडली आणि ट्रकचे मागील चाक थेट तिच्या डोक्यावरून गेले. घटनास्थळीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Nashik Accident News: घटनास्थळी एकच खळबळ, नागरिक संतप्त
अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला व ट्रक जप्त केला. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. ट्रक चालक अपघातानंतर फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.
Nashik Accident News: नागरिकांच्या मागण्या वारंवार दुर्लक्षित
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. गणेशनगरजवळील रिलायन्स पेट्रोलपंपाच्या आजूबाजूच्या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी आणि ट्रक-टेम्पोंची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे याठिकाणी स्पीड ब्रेकर, सिग्नल यांसारख्या सुविधा असाव्यात, अशी मागणी नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. परंतु, नाशिक महापालिका व वाहतूक विभागाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने, आज एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला, असा आरोप नागरिक करत आहेत.
Nashik Accident News: महेंद्र शिंदेंचा प्रशासनावर आरोप
या दुर्घटनेप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते महेंद्र शिंदे यांनी महापालिका प्रशासनावर थेट टीका केली. त्यांनी सांगितले की, "या संपूर्ण घटनेला नाशिक महापालिका प्रशासन जबाबदार आहे. नागरिकांच्या वारंवार निवेदनानंतरही उपाययोजना न करणं म्हणजे निष्काळजीपणा आहे," असे त्यांनी म्हटले आहे.
राज्य आणि देश, विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
इतर महत्त्वाच्या बातम्या
























