एक्स्प्लोर

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात, मजुरांची पिकअप अन् कारची जोरदार धडक, तीन ठार, 10 जण जखमी

Nashik Accident : नाशिकच्या सटाणा तालुक्यात अंतापूर-ताहराबाद महामार्गावर पिकअप आणि कारची जोरदार धडक झाली आहे.

Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यातील सटाणा (Satana) तालुक्यातील ताहाराबाद - अंतापूर मार्गावर गुरुवारी (11 सप्टेंबर) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅन आणि टाटा कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृतांमध्ये तान्हाजी सोनवणे, शंकर आबीस, आणि आशा सोनवणे यांचा समावेश आहे. सर्व मृत आणि जखमी मजूर हे सटाणा तालुक्यातील हनुमंत पाडा, बोरदैवत आणि असेरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, पिकअप वाहन चालकाने आयशर वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारच्याा समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. 

अपघातानंतर वाहतूक ठप्प

अपघातानंतर ताहाराबाद - अंतापूर मार्गावर काही वेळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना वाहनांद्वारे शासकीय रुग्णालयात हलवले. गंभीर जखमींपैकी दोन मजुरांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. अपघातस्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधित वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आमदार दिलीप बोरसे यांनी केली पाहणी

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मदतकार्याचा आढावा घेतला आणि जखमींवर योग्य उपचार होण्यासाठी संबंधित प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

Nashik Accident : राहुड घाट तब्बल 42 तासांनंतर वाहतुकीसाठी खुला 

दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात झालेल्या गॅस टँकर, ट्रक व पोकलेन यांच्या तिहेरी अपघातानंतर तब्बल 42 तास ठप्प झालेली वाहतूक बुधवारी (दि. 10) दुपारी तीन वाजता बीपीसीएल पथक, पोलीस व सोमा टोल पथकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर सुरळीत करण्यात यश आले. सोमवारी रात्री 9 वाजेपासून घाट बंदच होता. महामार्ग चौपदरीकरणानंतर मागील 15 वर्षांत अपघातामुळे इतक्या मोठ्या कालावधीसाठी वाहतूक ठप्प राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे साधारण 8 ते 9 हजार वाहने आणि सुमारे 32 ते 36 हजार प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. यात चांदवडच्या जैन गुरुकुल संस्थेत शिकणारे जवळपास तीन हजार विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांना मोठा त्रास झाला. दोन दिवसांचा वेळ वाया गेल्याने अभ्यासक्रमावरही परिणाम झाला. घाट बंद असल्याने उमराणे, सौदाणे, चिंचवे व मुगसे परिसरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना देवळा तालुक्यातील चिंचबारी किंवा मनमाडमार्गे शाळेत आणणे-नेणे भाग पडले. वाहनचालकांसाठी देखील ही परिस्थिती अत्यंत कष्टदायक ठरली. काही वाहनांनी पर्यायी मार्ग वापरला तर अनेक जड वाहनं महामार्गाच्या कडेला पार्किंग करून थांबून राहिली होती.

आणखी वाचा

Dhule Crime: धुळे हादरलं, माजी स्थायी समिती सभापतींच्या मुलानं आयुष्य संपवलं, वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसात...

 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: सैराटची पुनरावृत्ती; बहिणीशी प्रेमसंबंध असलेल्या तरूणाला स्मशानभूमीजवळ भेटायला बोलावलं, पोटावर, गळ्यावर, छातीवर अन् हातावर वार केले, त्र्यंबकेश्वर हादरलं!
सैराटची पुनरावृत्ती; बहिणीशी प्रेमसंबंध असलेल्या तरूणाला स्मशानभूमीजवळ भेटायला बोलावलं, पोटावर, गळ्यावर, छातीवर अन् हातावर वार केले, त्र्यंबकेश्वर हादरलं!
Nashik TCS Case News: बहुचर्चित TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी घडामोड; इम्तियाज जलील यांचाही आरोपींमध्ये समावेश
बहुचर्चित TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी घडामोड; इम्तियाज जलील यांचाही आरोपींमध्ये समावेश
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवत नजरकैदेत ठेवलं
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Crime News: पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
Pune Crime News: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
Chhatrapati Sambhajinagar Crime News : मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
Embed widget