Nagaradhyaksha Reservation : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आल्याने राज्य निवडणूक आयोगाने हालचालींना गती दिली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांवरील आरक्षणाची सोडत आज (6 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे आरक्षणही या सोडतीत निश्चित करण्यात आले.
Nagaradhyaksha Reservation : मंत्रालयात पार पडली सोडत प्रक्रिया
मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात, मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण निश्चित झाले असून, यामुळे आगामी निवडणुकीत महिला नेतृत्वाला मोठा संधी मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘मिनी विधानसभा’ मानल्या जात असल्याने याचे राजकीय महत्त्व मोठे आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, भगूर, येवला या नगरपरिषद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. तर ओझर अनुसूचित जाती महिला आणि कळवण व सुरगाणा नगरपंचायतचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गाकरिता राखीव झाले आहे. तसेच पेठ आणि दिंडोरी खुला महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जानेवारी महिना संपण्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे (Local Government elections) निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर प्रशासन वेगाने तयारीला लागले आहे. आज जाहीर झालेल्या आरक्षणामुळे कोणत्या राजकीय पक्षाला फायदा आणि तोटा होईल? हे निवडणुकीवेळी स्पष्ट होईल.
Nagaradhyaksha Reservation : आरक्षण सोडत जाहीर
देवळा : अनुसूचित जमाती
ओझर : महिला (खुला महिला प्रवर्ग)
भगूर : ओबीसी महिला
इगतपुरी : ओबीसी महिला
सटाणा : ओबीसी महिला
त्र्यंबकेश्वर : ओबीसी महिला
मनमाड : खुला
नांदगाव : खुला
कळवण : ओबीसी
सुरगाणा : ओबीसी
पेठ : खुला महिला
दिंडोरी : खुला महिला
इतर महत्त्वाच्या बातम्या
