एक्स्प्लोर

टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका

हर्षवर्धन सपकाळांचा मी जाहीर निषेध करतो असे म्हणत टिपू सुलतानचा फोटो लावणाऱ्या मालेगावमधील उपमहापौरांना शासनाने नोटीस काढावी, त्यांचे पद रद्द केले पाहिजे.

नाशिक : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून टिपू सुलतान (Tipu) प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. मालेगाव महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच राजकीय वातावरण तापले आहे. महापौरपदी ‘इस्लाम’ पक्षाच्या नसीरिन बानो खालीद शेख, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद यांची निवड झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतान यांच्या छायाचित्रामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यातच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांनी टिपू सुलतानी तुलना शिवजी महाराजांशी करत, ते इंग्रजांविरुद्ध लढल्याची माहिती दिली. त्यावरुन, सत्ताधारी भाजपमधील नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं. आता, शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash mahajan) यांनीही हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केलीय. 

हर्षवर्धन सपकाळांचा मी जाहीर निषेध करतो असे म्हणत टिपू सुलतानचा फोटो लावणाऱ्या मालेगावमधील उपमहापौरांना शासनाने नोटीस काढावी, त्यांचे पद रद्द केले पाहिजे, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली. तसेच, देशद्रोही टिपू सुलतानचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही. राज्य व देशातील काँग्रेसचे दुर्दैव्य की, त्यांना सपकाळ यांच्यासारखे नेते मिळाले. छत्रपती शिवरायांची तुलना धर्मांध 'टिपू' शी नको, अशांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कदापी होऊ शकणार नाही. टिपू सुलतान देशद्रोही होता, असेही प्रकाश महाजन यांनी म्हटले. 

पुन्हा फोटो लावणार

मालेगाव महानगरपालिकेतील वादग्रस्त छायाचित्र प्रकरणावर उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल, असे वक्तव्य त्यांनी एका स्वागत समारंभात केले. या वक्तव्यामुळे मालेगाव शहरात पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेकडून दखल

दरम्यान, टिपू सुलतान फोटो प्रकरणी राजकीय वातावरण तापल्यानंतर मालेगाव मनपा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे. नगरसचिवांकडून राष्ट्रपुरुषांचे फोटो लावण्याबाबत शासन आदेशासह पत्र जारी करण्यात आलं आहे. मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने वाद झाल्याचे पडसाद राज्य आणि देशभर उमटले. त्यानंतर, मनपा प्रशासनाकडून दखल घेत नगरसचिवांकडून राष्ट्रपुरुषांचे फोटो लावण्याबाबत शासन आदेशासह पत्र, महापौर, उपमहापौर, गटनेते आदींना पत्र वितरित करण्यात आले. 

हेही वाचा

वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खर्चा अर्थ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane: कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
मी बायकोला मारुन आलोय, पत्नीची हत्या करुन पती पोलिस स्टेशनमध्ये हजर, पोलिसांकडून आरोपीला अटक
मी बायकोला मारुन आलोय, पत्नीची हत्या करुन पती पोलिस स्टेशनमध्ये हजर, पोलिसांकडून आरोपीला अटक
मनमाडमध्ये कांद्याचे लिलाव बंद, दरात होणार घसरण, शेतकरी संकटात, लिलाव बंद होण्याचं कारण काय?
मनमाडमध्ये कांद्याचे लिलाव बंद, दरात होणार घसरण, शेतकरी संकटात, लिलाव बंद होण्याचं कारण काय?
Nashik Crime News: पोलीस असल्याचं सांगत व्यापाऱ्याचं अपहरण, 25 लाखांची मागितली खंडणी; छळादरम्यान व्यापाऱ्याने सोडला जीव, नाशिकमधील खळबळजनक घटना
पोलीस असल्याचं सांगत व्यापाऱ्याचं अपहरण, 25 लाखांची मागितली खंडणी; छळादरम्यान व्यापाऱ्याने सोडला जीव, नाशिकमधील खळबळजनक घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Embed widget