Nashik ZP : नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad) गटांची आरक्षण सोडत आज ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) जाहीर करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात नव्या रचनेनुसार ८४ गट असून यामध्ये सर्वाधिक महिलांना संधी देण्यात आल्याचे आरक्षण सोडतीनंतर दिसून आले आहे. जवळपास ८४ घटनांपैकी ३९ जागांवर महिला आरक्षित असणार आहे. 


संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती (Panchayat Samiti) गणांसाठी गुरुवारी (दि. २८) आरक्षण सोडत काढण्यात आली असून जिल्हा परिषद गट व पंचायत समितीतील गणातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी व सर्वसाधारण यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी ही सोडत काढण्यात आली.  दरम्यान अनुसूचित जाती महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असल्याने,  तीन गट महिलांसाठी राखीव असणार आहेत. 33 गट अनुसूचित जमातीसाठी राखीव असतील. त्यापैकी महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. 33 गटांपैकी 12 गट याआधी महिलांसाठी आरक्षित असल्याने, ते गट वगळण्यात आले आहे. उरलेल्या 21 पैकी 17 गट अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 5 गट होते. मात्र, 3 गट आरक्षित करायचे असल्याने, चिठ्ठी काढून 3 गट आरक्षित करण्यात आले.


तसेच 50 टक्के महिलांसाठी आरक्षण (Women Reservation) असल्याने 3 पैकी 2 गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे. सर्व साधारण गटातील 42 पैकी 20 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत या 42 पैकी 24 गटांना आतापर्यंत महिला आरक्षण नव्हते. त्यामुळे या 24 गटांमधून 19 गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                              


या आरक्षण यादीवर उद्यापासून 2ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येतील. हरकतींची पडताळणी करून 05 ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. या गटांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी (दि. 29) निवडणूक विभागाकडून आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. 29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान, गणनिहाय आरक्षण निश्चितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर करण्यासाठी मुदत दिली असल्याचे उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.


असे आहे जिल्ह्यातील गट आरक्षण 
अनुसूचित जमाती 17, अनुसूचित जाती 03, सर्वसाधारण 22 तर अनुसूचित जमाती (महिला) 17, अनुसूचित जाती (महिला) 03, सर्वसाधारण (महिला) 19. 


असे आहे तालुक्यातील गटांचे आरक्षण 


बागलाण तालुका 
मुल्हेर (सर्वसाधारण स्त्री), ताहाराबाद (सर्वसाधारण), जायखेडा (अनुसूचित जमाती स्त्री), नामपूर (ना.मा.प्र), वीरगाव (अनुसूचित जमाती स्त्री), डांगसौंदाणे (सर्वसाधारण स्त्री), ठेंगोडा (अनुसूचित जमाती), ब्राह्मणगाव (अनुसुचित जमाती). 


मालेगाव तालुका 
अस्ताणे (सर्वसाधारण स्त्री), झोडगे (अनुसूचित जमाती), कळवाडी  (अनुसूचित जमाती), वडेल (सर्वसाधारण स्त्री), रावळगाव (अनुसूचित जमाती), दाभाडी (अनुसूचित जमाती), सौंदाणे (सर्वसाधारण), टाकळी (अनुसूचित जमाती स्त्री), निमगाव (अनुसूचित जमाती). 


देवळा तालुका 
लोहणेर (अनुसूचित जमाती), उमराणे (अनुसूचित जमाती), खडे (वा) (अनुसूचित जमाती स्त्री ). 


कळवण तालुका 
पुनदनगर (सर्वसाधारण स्त्री), मानूर (सर्वसाधारण), कनाशी (ना.मा. प्र. स्त्री), दळवट (सर्वसाधारण), अभोणा (सर्वसाधारण ). 


सुरगाणा तालुका 
गोंदूने (सर्वसाधारण), भदर (सर्वसाधारण), बोरगाव (सर्वसाधारण स्त्री), भवाडा (सर्वसाधारण). 


पेठ तालुका 
सुरगाणे (सर्वसाधारण), कोहोर (सर्वसाधारण स्त्री), कुंभाळे (सर्वसाधारण). 


दिंडोरी तालुका 
अहिवंतवाडी (सर्वसाधारण), कसबे वणी (सर्वसाधारण स्त्री), खेडगाव (सर्वसाधारण), वरखेडा (सर्वसाधारण), कोचरगाव (सर्वसाधारण स्त्री), उमराळे बु. (सर्वसाधारण), मोहाडी (सर्वसाधारण). 


चांदवड तालुका 
धोडंबे (अनुसूचित जमाती स्त्री), दुगाव (अनुसूचित जमाती स्त्री),  वडनेरभैरव (सर्वसाधारण स्त्री), वडाळीभोई (अनुसूचित जमाती स्त्री), तळेगाव रोही (अनुसूचित जाती स्त्री). 


नांदगाव तालुका 
साकोरा (अनुसूचित जमाती स्त्री), न्यायडोंगरी (अनुसूचित जमाती स्त्री), भालुर (अनुसूचित जमाती स्त्री), जातेगाव (अनुसूचित जमाती स्त्री). 


येवला तालुका 
पाटोदा (सर्वसाधारण स्त्री), नगरसूल (अनुसूचित जमाती), राजापूर (सर्वसाधारण स्त्री),अंदरसूल (सर्वसाधारण स्त्री), मुखेड (अनुसूचित जमाती). 


निफाड तालुका 
पिंपळगाव ब (ना.मा.प्र स्त्री), पालखेड  (अनुसूचित जमाती स्त्री), लासलगाव (सर्वसाधारण स्त्री), विंचूर (अनुसूचित जमाती, उगाव (अनुसूचित जमाती), पिंपळस  (अनुसूचित जमाती स्त्री), कसबे सुकेणे (अनुसूचित जमाती), सायखेडा (अनुसूचित जमाती), देवगाव अनुसूचित जमाती (स्त्री). 


नाशिक तालुका 


गिरणारे (सर्वसाधारण स्त्री), प्रिंप्री सय्यद (अनुसूचित जमाती स्त्री), पळसे अनुसूचित जमाती (स्त्री). गोवर्धन (सर्वसाधारण), लहवित (सर्वसाधारण स्त्री). 


त्र्यंबकेश्वर तालुका 
बेरवळ (सर्वसाधारण स्त्री), हरसूल (सर्वसाधारण), वाघेरा (सर्वसाधारण), अंजनेरी (अनुसूचित जाती). 


इगतपुरी तालुका 
खंबाळे (सर्वसाधारण स्त्री), वाडीवऱ्हे (अनुसूचित जाती), घोटी बु (अनुसूचित जमाती स्त्री), नांदगाव सदो (सर्वसाधारण), धामणगाव (सर्वसाधारण). 


सिन्नर तालुका 
माळेगाव (अनुसूचित जाती स्त्री), मुसलगाव (सर्वसाधारण स्त्री), सोमठाणे (सर्वसाधारण स्त्री), पांगरी बु, (सर्वसाधारण), दापूर (सर्वसाधारण), शिवडे (अनुसूचित जमाती), नांदूर शिंगोटे (अनुसूचित जमाती).