Nashik Open University : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (Open University) मार्फत कुलगुरू (Chancellor) नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठा मार्फत या पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून इच्छुकांना पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.


नाशिक (Nashik) येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू ही वायू नंदन ( E Vayunandan) यांचा मार्च महिन्यात कुलगुरू पदाचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी जी पाटील यांच्याकडे मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला होता. जवळपास सहा महिने डॉ. पाटलांनी हा कारभार सांभाळला. त्यानंतर आता पूर्ण वेळ कुलगुरू नियतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या नमुन्यानुसार आपली तपशीलवार माहिती स्वतःच्या उमेदवारी बाबतचे दोन पानांचे समर्थन विद्यापीठाबाबतची भविष्यातील दोन पानी योजना आणि स्वतःच्या कार्याची ओळख असलेल्या तीन नामांकित व्यक्तींची नावे व त्यांचा संपर्क तपशील संदर्भ पत्राचा पाठवणे गरजेचे आहे.


राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांनी मुक्त विद्यापीठाच्या कायद्यानुसार कुलगुरू पदासाठी शिफारस करण्यासाठी तीन सदस्य कुलगुरू शोध समितीची स्थापना केली असून या समितीकडून हे अर्ज मागविण्यात येत आहेत. समितीमार्फत पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथील डॉक्टर संदीप मिश्रा यांनी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे इच्छुकांना अर्ज पाठवावे लागणार असून थेट निवड समितीकडे कोणीही अर्ज पाठवून येत अशी सूचना समितीमार्फत देण्यात आले आहे. मुक्त विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू हे अतिरिक्त कारभार पाहत असल्यामुळे त्यांना विद्यापीठाच्या कामांमध्ये लक्ष घालण्यात अनेक मर्यादा येत होत्या. त्यामुळे लवकरच आता मुक्त विद्यापीठाला नवीन कुलगुरू लाभणार असणारे सर्व कामे सुरळीत होणार आहेत.


जुन्या पद्धतीनेच कुलगुरू नियुक्ती 
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना या सरकारने विद्यापीठ कायद्यात बदल करून कुलगुरू नियुक्ती प्रक्रियेत बदल करण्याची शिफारस केली होती. राज्य सरकारच्या दोन प्रतिनिधींचा समावेश करून त्यांच्यामार्फत कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांकडे नावांची शिफारस करण्याचा हा बदल होता राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत याबाबतची कागदपत्रे मार्गदर्शनासाठी तत्कालीन राष्ट्रपतींकडे पाठवली होती. परंतु दरम्यान राज्यात झालेल्या सत्ता नाट्यांमुळे हे बदल बारळगले असून कुलगुरू नियुक्ती जुन्या पद्धतीनेच होणार असल्याचे या प्रक्रियेतून स्पष्ट झाले आहे.