Kasara Ghat Accident : मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) नवीन कसारा घाटात (Kasara Ghat) आज (4 जून) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक कोंबड्याही या मरण पावल्या असून अपघातानंतर रस्त्यावर कोंबड्यांचा खच दिसून आला. दरम्यान या अपघाताचे कारण समजू शकले नाही. 


नाशिक-मुंबई महामार्गावर (Nashik Mumbai Highway) नवीन कसारा घाटात पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची (Major Accident) घटना घडली. या भीषण अपघातात अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चार वाहनांमध्ये हा विचित्र अपघात झाला असून दोघा जणांना जीव गमवावा लागला आहे. यातील अपघातग्रस्त वाहनामध्ये कोंबड्याची वाहतूक सुरु होती. मात्र अपघातात वाहनाचा चक्काचूर झाल्याने अनेक कोंबड्या मरण पावल्या आहेत. त्यामुळे कसारा घाटात कोंबड्यांचा खच दिसून आला. आयशर, छोटा हत्ती आणि दोन पिकअप वाहनांमध्ये हा विचित्र अपघात झाला. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला पुढील उपचारासाठी इगतपुरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


नाशिक-मुंबई महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलं


नाशिक-मुंबई महामार्ग अपघाताचे केंद्र बनत असून रोजच अनेक अपघातांना सामोरे जावे लागत आहे. यात मृत्यूचे प्रमाण अधिक असून अनेकदा वेगाने वाहन चालवल्याने, ओव्हरटेक करताना अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. यात चार वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने हा अपघात झाला. यातील दोन जणांचा मृत्यू झाला असून अन्य जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना इगतपुरीच्या (Igatpuri) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन्ही पिकअपमधून कोंबड्याची वाहतूक केली जात होती, त्यातील काही कोंबड्याच्या मृत्यू झाला आहे. कसारा पोलीस आणि महामार्ग पोलीस, आणि रुट पेट्रोलिंग टीम घटनस्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. 


रस्त्यावर कोंबड्यांचा खच 


दरम्यान कसारा घाटात रात्रीच्या सुमारास अपघात अधिक होत असल्याचे चित्र आहे. यावेळी आयशर, छोटा हत्ती आणि दोन पिक अप यांच्यात हा विचित्र अपघात झाला. दोन्ही पिकअप गाड्यांमधील कोंबड्या मृत्युमुखी पडून रस्त्यावर पडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर कोंबड्याच कोंबड्या दिसून येत आहेत. कसारा पोलीस आणि महामार्ग पोलीस, रुट पेट्रोलिंग टीम घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त वाहने टोल क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले. इस्तकार इजहर खान, मुस्तफा खान अशी मयतांची मयत नावे असून वजीर खान हे जखमी व्यक्तीचे नावे आहेत. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र कैलास गतीर यांनी अपघातस्थळी दाखल होऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले.