Nashik Shrikant shinde : चार भिंतींच्या आत बसलो, घरात बसलो तर लोकांच्या भावना कार्यकर्त्यांच्या भावना कशा कळणार? आज अधिवेशनात बोलणारे अडीच तीन वर्षात पहिल्यांदाच नागपूरला (Nagpur) आले असतील. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असा शब्दांत डॉ. श्रीकांत शिंदे (Srikant Shinde) यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीला सुनावले आहे. 


खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Udhhav Thackeray) जोरदार हल्लाबोल हल्लाबोल केला. ठाकरे यांनी आज हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न उपस्थित केला. यावर शिंदे म्हणाले की आज अधिवेशनात बोलणारे अडीच तीन वर्षात पहिल्यांदाच नागपूरला आले असतील. सीमा वादावर सरकार गंभीर आहे. त्यामुळे त्यांनी फार काळजी करू नये, असा टोला त्यांनी हाणला.


डॉ. शिंदे यांनी ठाकरेंवर टीका करताना पुढे म्हणाले, की चार भिंतींच्या आत बसले, घरात बसलो तर लोकांच्या भावना कार्यकर्त्यांच्या भावना कशा कळणार? लोकांच्या, कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेण्यासाठी ग्राउंड लेव्हलवर काम करावे लागतात. लोकांमध्ये मिसळावे लागतं. कार्यकर्त्यांना जपावं लागतं. आत्तापर्यंत अनेक सत्तांतर झाली पण हे सत्तांतर ऐतिहासिक होतं. पन्नास आमदारांसह 13 खासदार का गेले? याचं आत्मपरीक्षण करायला हवं? लोक का चालले आहेत? का चुकतय हे तपासायला हवं? असा सल्ला यावेळी श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला. त्याचबरोबर हे डबल इंजिन सरकार आहे, चांगलं काम करत आहे. राज्याच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा केंद्राची मदत लागेल, तेव्हा केंद्राकडून मदत घेण्याचं मोठ्या मनाने हे सरकार करेल. तुम्ही अडीच वर्ष घरी बसून काम केलं, राज्याला मागे नेलं असे ते महाविकास आघाडीला उद्देशून म्हणाले.


महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधिमंडळ अधिवेशनात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनामाची मागणी केली. याबाबत डॉक्टर शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले की विरोधकांकडे काही प्रश्न सोडलेले नाहीत शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून लोकहिताची अनेक निर्णय घेतले जात आहेत बाळासाहेबांच्या शिवसेनेत येण्याचा लोकांचा ओढा ही वाढत चालला आहे येणाऱ्या काळात अनेक जण येण्याची चूक आहेत त्यामुळे विरोधकांकडे प्रश्नच उरलेले नसल्याने काहीतरी मुद्दे काढायचे अभ्यास करायचा नाही फक्त बेछूट आरोप करत सुटायची इतकेच त्यांचे काम आहे आरोप करण्यापलीकडे विरोधकांकडे काहीच काम नसल्याचे म्हणत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.


ते लोकांची सकाळ खराब करत आहेत... 
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही डॉ. शिंदे आणि जोरदार टीका केली. ते म्हणाले की राऊत यांच्याबरोबर अनेक लोक होते. तेव्हा चांगले होते आता सोडून गेल्यानंतर ते त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, तुमचं नेतृत्व त्यांना मान्य नाही. तुम्ही रोज मनोरंजन नाही तर लोकांची सकाळ खराब करत आहेत. तुमची सकाळ खराब आहे. पण लोकांची पण सकाळ खराब करत असल्याचं शिंदे म्हणाले लोकांना हे चालणार नाही. लोकांना विकास हवा आहे. तो विकास आमचं सरकार शिंदे भाजप सरकार करत असल्याचं त्यांनी यावेळी ठासून सांगितलं सीमावाद प्रश्न महाराष्ट्र एकीकरण समिती आज आंदोलन करत आहे. त्यावर डॉ. शिंदे म्हणाले की सीमा वादावर बेळगाव मध्ये जेव्हा आंदोलन झाले, तेव्हा एकनाथ शिंदे स्वतः जेलमध्ये होते. त्याची तीव्रता त्यांना जास्त माहित आहे. सरकार एकीकरण समिती सोबत आहे. योग्य ती पावले नक्कीच उचलली जातील असे यावेळी सीमा वादावर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले.