Nashik Crime : 'दिवसा रेकी, रात्री घरफोडी', अंबड पोलिसांनी सराईतांच्या आवळल्या मुसक्या, २० लाखांचा मुद्देमाल जप्त
Nashik Crime : अंबड पोलिसांनी (Ambad Police) उल्लेखनीय कामगिरी केली असून गंभीर गुन्ह्यातील तीन संशयितांसह २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Nashik Crime : नाशिक पोलिसांनी (Nashik Police) शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी धडक मोहीम सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अंबड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून गंभीर गुन्ह्यातील तीन संशयितांसह २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नाशिक शहर (Nashik) आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने धुमाकूळ घातला असून यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. परिणामी यावर उपाय म्हणून शहर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून पोलिसांची विविध पथके दिसवभर गस्तीवर राहून गुन्हेगारांचा बिमोड करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशातच अंबड पोलिसांनी धडक कारवाई करताना उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
राज्यातील उस्मानाबाद, परभणी येथील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. अभिषेक उद्धव विश्वकर्मा व त्याचे दोन सहकाऱ्यांकडून २८ तोळे सोने, ०२ मोटारसायकल, एक ओमनी गाडी, लॅपटॉप असा एकूण २० लक्ष रुपयांचा मुद्देमालजप्त करण्यात आला आहे. याबाबत अंबड पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे त्यांनी सापळा रचून या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पकडलेल्या मधील एक संशयित दिवसा घरांची रेकी करत असून रात्रीच्यावेळी घरफोडी करायचे, याबरोबरच इतरही गुन्ह्यात हे मास्टर माईंड असल्याचे सांगितले आहे.
१४ गुन्हे उघडकीस
नाशिकच्या अंबड पोलिसांनी 14 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. यात 13 घरफोडीचे गुन्हे हे अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील आहे तर 1 सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. या घरफोडी च्या गुन्ह्यातील एका मुख्य संश्यीता सह 2 साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हे
अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिन्ही सराईत गुन्हेगार असून जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला हे तिघेही संशयित हवे आहेत. तर त्यांनी यापूर्वी अंबड, सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत १४ गुन्हे केले आहेत. तर अंबड, इंदिरानगर, लासलगाव, गंगाखेड, उस्मानाबाद शहर, उस्मानाबाद बेंबळी आदी ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये या संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
