Nashik Civil Hospital : बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र (Bogus Certificate) अपहार प्रकरणातील तत्कालीन अतिरिक्त डॉ. अति. शल्य चिकित्सक निखिल सैंदाणे (Nikhil Saindane) यांच्या अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला. त्यामुळे डॉ. सैंदाणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. शिवाय बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र आणि कोविड काळातील 75 कोटींच्या उपकरणे खरेदीतही केंद्रीय आरोग्य सचिवांनी ठपका ठेवत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नवीन समितीच्या माध्यमातून या प्रकरणाचा छडा लावला जाणार आहे.
नाशिक (Nashik) जिल्हा रुग्णालयातून आंतरजिल्हा बदलीसाठी (Transfer) बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र रॅकेट काही दिसवांपूर्वी उघडकीस आले. यामध्ये ग्रामीण पोलीस दलातील 21 पोलीस कर्मचाऱ्यांवरच पोलीस दलाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयाचा कर्मचारी कांतीलाल गांगुर्डे, पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक हिरा कनोज हे दोघे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान या प्रकरणात काही खाजगी रुग्णालयात समावेश असल्याचे समोर आले होते. त्यानुसार संशयित डॉ. स्वप्नील सैंदाणेसह विवेक ठाकरे यास अटक करण्यात आली आहे.
ग्रामीण पोलिसांनी अंतर जिल्हा बदलीसाठी जिल्हा रुग्णालयाचा बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवत बदली करून घेतली. याप्रकरणी 21 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. तालुका पोलिसांनी वरिष्ठ लिपिक हिरा कनोज लिफ्ट मॅन कांतीलाल गांगुर्डे, खासगी डॉ. स्वप्नील सैंदाणे तसेच रुग्णालयाच्या व्यवस्थापकाला अटक केली आहे. तर डॉ. सैंदाणे, डॉ. श्रीवास आणि लिपिक किशोर पगारे हे तिघेही फरार असल्याचे समजते. याच प्रकरणातील लिपिक किशोर पगारे यांचाही जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे, तेव्हापासून हे दोघे फरार आहेत.
वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरण नवीन समिती
पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र आणि कोविड काळातील 75 कोटींच्या उपकरणे खरेदीतही केन्दिरी आरोग्य सचिवांनी ठपका ठेवत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र या चौकशीला 15 दिवस होऊनही हालचाल नसल्याने प्रकरणांतील जुनी समिती गुंडाळून त्याऐवजी नवी समिती गठीत करण्यात आली आहे. या चौकशी समितीत जेष्ठ फिजिशियन गणेश चेवले यांना अंतर्भूत करण्यात आले आहे. त्यामुळे आता नवीन समिती गठीत केल्याने अहवाल यायला देखील विलंब लागणार असल्याचे चित्र दिसते आहे.
इ-टेंडर प्रक्रियेत अपहार
जिल्हा रुग्णालयाचे कंत्राटी कामगार पुरवठा करण्याचे इ-टेंडर प्रक्रियेत अपहार झाल्याचा संशय व्यक्त होत असून हे कंत्राट अनधिकृत असल्याचा ठपका कामगार आयुक्त कार्यालयाने ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकच कंत्राट दोन ठेकेदारांना विभागून दिल्याने यामध्ये ‘अर्थ’पूर्ण व्यवहार झाल्याने रुग्णालयातील पुन्हा एक अपहार समोर आला आहे. ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून पैशांची मागणी होत असल्याचा आरोप केल्याची माहिती सूत्रांनी दिली.