Maharshtra Nashik CNG Rate : काही महिन्यांपूर्वी राज्यातील अनेक शहरात सीएनजीच्या (CNG Rate) दरात कपात करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा नाशकात (Nashik) सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली असून प्रति किलोला वाहनधारकांना 96 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत. रविवारपासून हे दर लागू झाले असून सीएनजी दरासोबत वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. 


राज्यात एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol and Diesel) भाव गगनाला भिडले असतांना दुसरीकडे सीएनजीच्या (CNG) दरातही वाढ झाली आहे. नाशकात (Nashik) मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात 4 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजीचा दर प्रतिकिलो 96.50 रुपयांवर पोहचला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये सीएनजीचे दर प्रतिकिलो 71 रुपये इतके होते. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस 10 रुपयांनी तर जून महिन्यात 4 रुपयांनी वाढ झाली होती. यानंतर आता पुन्हा चार रुपयांची वाढ झाली असून सीएनजीचा भाव 96 रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचले आहेत.


काही महिन्यांपूर्वी सीएनजी वाहनधारकांकडून सीएनजी दर वाढवल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत होती. एकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव परवडत नसल्याने वाहनधारकांचा कल सीएनजीकडे वळाला होता. मात्र सीएनजी धारकांनीच दर चढविल्याने सीएनजी वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तीन रुपयांनी सीएनजीचे दार कमी करण्यात आले होते. त्यावेळी 92 रुपयांवर सीएनजी मिळत होता. मात्र पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ झाली असून रविवारी मध्यरात्रीपासून हे दर लागू करण्यात आले आहेत. 


एकीकडे पेट्रोलच्या किमती वाढल्याने वाहनधारकांनी सीएनजी वाहनांचा पर्याय निवडला. परंतु मागील काही महिन्यात यांच्या किमती इतक्या वाढल्या की त्या पेट्रोल आणि डिझेलच्या पातळीवर गेल्याची वाहनधारकांची सांगितले सीएनजीची दरवाढ वाहनधारकांची आर्थिक समीकरण विस्कळीत करणारी ठरत आहे. दुसरीकडे शहरात सीएनजी वाहने वाढत असताना पुरेशा प्रमाणात गॅसची उपलब्धता होत नाही. सीएनजी घेण्यासाठी भल्या सकाळपासून पंपावर वाहनांच्या रांगा लागतात. गॅस संपुष्टात आल्यावर रांगेतील वाहनधारकांना माघारी फिरावे लागते.


नाशिकचे पेट्रोल डीझेल आजचा दर 
नाशिकमध्ये (Nashik) अलीकडच्या काळात सीएनजीच वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र सीएनजी वाहनांच्या संख्येच्या तुलनेत सीएनजी पंप कमी आहे. वाढत्या किमती व सीएनजी मिळवतानाची दमछाक यामुळे वाहनधारक त्रस्तावले आहे. या स्थितीत पुन्हा एकदा सीएनजीचे दर प्रतिकिलोला चार रुपयांनी वाढल्यामुळे वाहनधारकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये आजचा पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.65 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 93.15 रुपये आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात हाच दर असून वाहनधाकरकांमध्ये सध्यातरी समाधान आहे.