Nashik Bus Fire : नाशिक (Nashik) जिल्ह्यात अग्नितांडव सुरूच असून पुन्हा एकदा आगीची घटना समोर आली आहे. नाशिकच्या चांदवड घाटात (Chandvad Rahud Ghat) बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे, वेळीच चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्याने मोठा अनर्थ टळला. 


गेल्या काही महिन्यांपासून नाशिकसह जिल्हाभरात सातत्याने आगीच्या (Fire Incident) घटना समोर येत आहेत. अनेक बसेससह खाजगी वाहनांना आग लागण्याच्या घटना नेहमी घडत आहेत. औरंगाबाद नाक्यावरील मिरची चौफुली वरील भीषण आगीच्या घटनेने राज्याला हादरवून सोडलं होतं. तरी इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत लागलेल्या भीषण आगीत तीन जणांना आपला प्राण गमावावा लागल्याची घटना घडली होती. आता पुन्हा नाशिकच्या चांदवड घाटात बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाले आहे, मात्र आग का लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.


अधिक माहिती अशी की मालेगाव वरून नाशिककडे येणारे बस चांदवड घाटात आली असता बसने अचानक पेट घेतला. बसने पेट घेताच बस चालक आणि कंडक्टरने सर्व प्रवाशांना प्रसंगावधान राखत, तात्काळ खाली उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. आग लागताच प्रवाशांनी तात्काळ सर्वांना सूचित करत बस बाहेर पळ काढला. घटनेतील सर्व प्रवासी सुखरूप असून वेळीच चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्याने मोठा अनर्थ टळला. चांदवडच्या राहुड घाटात चालत्या बसने पेट घेतला, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे 35 प्रवाशांचे प्राण वाचले. चांदवड - शहादा ते मुंबई जाणाऱ्या बसला चांदवड तालुक्यातील राहुड घाटात आग लागली. बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले. बस चालकाने सतर्कता दाखवत बस महामार्गाच्या कडेला उभी करत, बस मधील 35 प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी मंगरूळ टोल नाक्यावरील अग्निशमन दलाच्या गाडीने त्वरित घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.


मालेगावहून निघालेली बस चांदवड घाटात आली असता चालकास इंजिन मधून धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. बस एका बाजूला रस्त्याच्या कडेला घेतली आग लागल्यानंतर काही क्षणात एखाद्या कागदाप्रमाणे बस जळून खाक झाली. यावेळी चांदवड घाटातून जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी वाहने रस्त्यातच थांबवल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान बसला लागलेली आग भिजवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशामन विभागाच्या दलाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळानंतर आग नियंत्रणात आली मात्र या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.


देखभाल दुरुस्ती गरजेची... 


गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना घडत आहेत. तरीदेखील एस टी महामंडळ सुरक्षिततेसाठी नेमक्या काय उपाययोजना करत आहेत, हे सुटलेले कोड आहे. वारंवार होणाऱ्या घटनांनी नागरिकाना देखील प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. बसेसची देखभाल दुरूस्ती नसल्याने इंजिनमध्ये बिघाड, आग लागल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वेळीच मेंटटन्स होत नसल्याने यावर एसटी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे आवश्यक आहे.