(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik NMC election : नाशिक मनपा निवडणूकीसाठी प्रशासन 'ऍक्टिव्ह मोड'वर, 325 अधिकाऱ्यांची नेमणूक
Nashik NMC election : नाशिक (Nashik) मनपा निवडणुक तारीख अजून जाहीर करण्यात आली नसली तरीही नाशिक महापालिका (Nashik NMC Election) प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतल्याचे दिसून येत आहे.
Nashik NMC election : एकीकडे राज्यात नवे सरकार आणल्यानंतर आता मनपा निवडणुकांचे (Nashik NMC) वेध सर्वानाच लागले आहे. अशातच मनपा निवडणुक तारीख अजून जाहीर करण्यात आली नसली तरीही नाशिक महापालिका (Nashik NMC Election) प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान महापालिका निवडणूक कामासाठी महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सुमारे 325 अधिकारी तसेच सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.
नाशिक मनपा निवडणुकीची मतदार यादी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर हरकती नोंदविण्यासाठी नागरिकांना मुदत देण्यात आली होती. सध्या प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतीचा निपटारा करण्याचे काम सुरू असून येत्या 9 जुलै रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. अद्याप निवडणुक कधी होणार याबाबत अस्पष्टता असली तरी मनपा प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. महापालिका निवडणूक कामासाठी महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सुमारे 325 अधिकारी तसेच सेवकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
नाशिक महापालिका प्रशासनाने यापूर्वीच प्रभाग रचना जाहीर करून त्याच्यावर हरकती मागवल्या होत्या, त्या निकाली निघाल्यानंतर महिला आरक्षण तसेच राखीव प्रभागाचे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. 23 जून रोजी शहरातील एकूण 44 प्रभागांचे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याच्यावर 3 जुलै पर्यंत हरकती घेण्यात आल्या आहेत. जवळपास 3851 हरकती दाखल झाल्या असून महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्या आदेशानुसार स्थळ पाहणी देखील करण्यात येत आहे. त्यासाठी 44 स्वतंत्र पथके देखील तयार करण्यात आली आहे. दरम्यान सर्व सह विभागांचे विभागीय अधिकारी यांच्यासह प्रशासन उपायुक्त मनोज घोडे - पाटिल तसेच काही शाखा अभियंता निवडणुकीच्या कामात गुंतले आहे.
सुट्टीच्या दिवशीही काम
नाशिक मनपा निवदानी मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 23 जून ते 1 जुलै पर्यंत हरकत घेण्याची मुदत देण्यात आली होती. प्रारंभी नागरिकांकडून मोजक्या हरकती घेण्यात आल्या, मात्र शेवटच्या काही दिवसांत मात्र मोठ्या प्रमाणात हरकती घेण्यात आल्या. यानंतर नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांनी हरकतीची मुदत वाढ मिळावी, अशी मागणी केल्यानंतर आयुक्तांनी तीन दिवसांनी त्यात वाढ केली होती.त्यात दोन व तीन जुलै अशा शनिवार -रविवार सुट्टीच्या दिवशी देखील हे काम करण्यात आले. रविवारी उशिरापर्यंत हरकती दाखल करून घेण्यात आल्या.