Nashik Crime : नाशिक (Nashik) पोलिसांच्या गुन्हे शाखेने महत्वपूर्ण कामगिरी केली असून धाडसी चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरटयांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून 32 लाखांचा मुद्देमालासह वाहन हस्तगत करण्यात आले आहे. 


नाशिकमध्ये चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) धडक मोहीम हाती घेतली असून चोरीच्या गुन्ह्यांचा कसून तपास केला जात आहे. दरम्यान शहरातील उपनगर भागात 10 जुलै रोजी ईश्वर बंगला नं 18, अष्वीन को.ऑ. हाउसिंग सोसायटी येथून लोखंडी शटरचे कुलुप तोडुन लोखंडी कपाट व तिजोरीतील सोन्या चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबत संजय ईष्वरलाल बोरा यांनी उपनगर (Upnagar Police Station) पोस्टे येथे फिर्याद दिली होती. 


दरम्यान सादरगुन्हा दाखल झाल्यानंतर या घटनेचा तपास सुरु असताना संशयितांनी रिट्स या कराचा वापर केल्याचे समोर आले. त्यावरून रिटस कारचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक मुंबई येथे गेले. पंरतु त्याचा उपयोग होवू शकला नाही. बंगल्यात मिळालेल्या संशयितांच्या सीसीटीव्ही फुटेज वरून ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असताना पोलीस हवालदार भालेराव यांना गुप्त माहितीच्या आधारे एक रिट्स कारमध्ये दोन इसम मोटवाणी रोड, दत्तमंदीर
भागातसंशयास्पद रित्या फिरत आहे. मिळालेल्या बातमीवरून लागलीच घटनास्थळी सापळा लावला. 


नाशिक गुन्हे शोध पथकाने लावलेल्या सापळ्यात रिट्स कार येताना दिसली. सदर गाडीत दोन इसम बसलेले होते. पोलीसांना पाहताच ते घाबरून गेले. त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीची कबुली दिली. यामध्ये रोहन संजय भोळे, ऋशीकेश मधुकर काळे अशी दोघं संशयितांची नावे आहेत. त्यावरून त्यांना उपनगर पोलीस स्टेशनच्या वरील दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. 


असा आहे जप्त मुद्देमाल 
दरम्यान चोरीच्या घटनेत अटक केलेल्या दोन संशयितांकडून 21 लाख 68 हजार 500 रूपये किमंतीचे सोने, चांदीचे हिरे जडीत दागिने, 4 लाख रुपयांची राखाडी रंगाची रिट्स कार, पाच लाख रुपयांची सफेद रंगाची मारूती कंपनीची स्विफ्ट कार, 50 हजार रुपये किमतीची सुझुकी कंपनीची सफेद रंगाची अक्सेस मोपेड व  1 लाख 20 हजारांचे 2 मोबाईल फोन जमा करण्यात आले आहेत. असा 32 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.