Nashik Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं महाअधिवेशन नाशिकमध्ये घेतलं होतं. नाशिक ही पवित्र जागा आहे. इकडे सगळी पापं रामकुंडामध्ये (Ramkunda) बुडवली जातात, या भाजपला देखील आम्ही इथेच बुडवू, असा इशारा संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना दिला आहे. 


संजय राऊत (Sanjay Raut) हे कालपासून (मंगळवार) नाशिक (Nashik) शहरात आहेत. त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधतांना नाशिकमध्ये भगवाच फडकणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत नाशिकवर कमळ फुलणार, असा नारा देण्यात आला. यावर संजय राऊत म्हणाले की, नारा देऊ दे त्यांना, मात्र नाशिकवर भगवाच (Shivsena) फडकणार हे लिहून घ्या. बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिकवर अतीव प्रेम होते. मात्र आता गिरीश महाजन यांच्यासारख्या लोकांनी नाशिकची जी परिस्थिती केली आहे, त्यामुळे नाशिककरांना वीट आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं महाअधिवेशन नाशिकमध्ये घेतलं होतं. नाशिक ही पवित्र जागा असून इकडे सगळी पापं रामकुंडामध्ये बुडवली जातात, या भाजपला देखील आम्ही इथेच बुडवू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. 


तसेच, ते पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांचा भगवा कोणीही खांद्यावर घेऊ शकतं. देशातील कोणताही नागरिक शिवरायांचे विचार पुढे नेण्याचं काम करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. सेनेला कोणाचाही फटका बसत नाही, शिवसेना फटके देते. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं महाअधिवेशन नाशिकमध्ये घेतलं होतं. नाशिक ही पवित्र जागा आहे. मात्र हल्ली नाशिकमध्ये टोकन देण्याचे प्रकार वाढले आहेत. रेट कार्डनुसार, प्रवेश होत आहेत. सुरुवातीला ऑर्डर दिली जाते. काही लोकांना टोकन देऊन ठेवले, मग आमचा मुहूर्त पाहून प्रवेश करतात. तसं टोकन हे व्यापारात दिलं जातं. 


अमित शाहा यांना छत्रपतींचा आशीर्वाद लाभणार नाही... 


अमित शाहा कुठेही गेले तरी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद काही लाभणार नाही, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना तुम्ही शेवटपर्यंत अभय दिलं, त्यांचे समर्थन केले, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना मानणारा या महाराष्ट्रातला समाज पाठिंबा देईल असं वाटत असेल तर त्यांचा गैरसमज आहे. शिवनेरीवर जरूर जा आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातीत जन्माला आले. त्या मातीतून जर काही पवित्र गोष्टी घेऊन जाता आल्या, तर चांगली गोष्ट आहे. विशेषतः बेईमानी आणि गद्दारी शिकून गेला तरी शिवसेनेविषयी अनेक गोष्टी कळतील. 


पाहा व्हिडीओ : Sanjay Raut On Nashik Election : नाशिकमध्ये भगवा झेंडाच फडणकणार : संजय राऊत



आमच्यापेक्षा उत्तम व्यवस्था अबू जिंदाल, कसाबची... 


तसेच ते म्हणाले की, तुरुंगातील परिस्थितीवर कधीही भाष्य केलं नाही. कारण मी रडणारा माणूस नाही. तुरुंगात ज्या परिस्थितीत मी राहिलो. आमच्यापेक्षा उत्तम व्यवस्था अबू जिंदाल आणि कसाबची होती, असा घणाघाती आरोपही यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केला. राजे छत्रपती यांनी शिवस्मारकाबद्दल म्हटलं आहे की, वेळ काढूपणा केला जात असून खर्च वाढवला जात आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे त्या कामात असून भाजपबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या बैठका होत असतात. त्यामुळे सरकार आणि संभाजी महाराजांनी एकत्र बसून त्याबाबत निर्णय घ्यावा, आम्ही सगळे संभाजी महाराजांच्या सोबत आहोत. मात्र त्यांचे सरकारसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.