एक्स्प्लोर

सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शक्तीचं प्रतिक म्हणजे कुंभमेळा, इथं येऊन मला प्रसन्न वाटलं : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व 2026-28 चा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. इथं येऊन मला प्रसन्न वाटत आहे असे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले.  

Kumbh Mela Nashik Draupadi Murmu : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (31 ऑक्टोबर 2026) नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व 2026-28 चा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोदावरी नदीच्या पवित्र रामकुंड येथे विधिवत गंगापूजन आणि वैदिक मंत्रोच्चारात धर्मध्वज फडकवला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्री साधु संत उपस्थित होते. दरम्यान, यावेळी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  म्हणाल्या की, इथं येऊन मला प्रसन्न वाटत आहे. मला या समारंभात सहभागी होण्याचे भाग्य मिळाले असे त्या म्हणाल्या. 

आस्था आणि सामाजिकतेचे प्रतीक म्हणजे कुंभमेळा

त्रंबकेश्वर दर्शन कुशावर्त तिर्थ दर्शन झाले आहे. चार ठिकाणी कुंभमेळा भरतो, जगभरात विख्यात आहे. कुंभमेळा सांस्कृतिक अध्यात्मिक शक्तीचं प्रतिक असल्याचे  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.1400 वर्षापूर्वी कुंभ भरल्याचे दाखले आहेत. आस्था आणि सामाजिकतेचे प्रतीक म्हणजे कुंभमेळा असेही त्या म्हणाल्या. या पावन धरतीला कोटी कोटी प्रणाम करते. ही तपो भूमी आहे. श्री रामचे पदस्पर्श झाले आहे. माँ गोदावरी ला प्रणाम करते असेही त्या म्हणाल्या.

कुंभ कसा भव्य दिव्य होईल यासाठी प्रयत्न करु : मुख्यमंत्री 

नाशिकमध्ये जलदगतीने कामे होत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. नाशिक आणि त्रंबकेश्वरचे रुप बदलणार आहे. काहींना वाटत होते कामे होणार की नाही. लोकांना त्रास झाला पण आता कामे होत आहेत असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. साधू संत मालक आहेत. आम्ही सेवक आहोत. चूक झाली तर आम्हला माफ करा कुंभ कसा भव्य दिव्य होईल यासाठी प्रयत्न करु असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. 

हा सोहळा धार्मिक नसून भारताच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा : गिरीश महाजन

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत ऐतिहासिक, मंगलमय आणि अभिमानाचा दिवस होता. देशाच्या महामहिम राष्ट्रपती आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या शुभहस्ते नाशिकच्या पवित्र रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र कुशावर्त तीर्थावर एकाच शुभमुहूर्तावर धर्मध्वजारोहण संपन्न झाले. या ऐतिहासिक सोहळ्याने सिंहस्थ कुंभमेळा 2027 चा विधिवत शुभारंभ झाला आहे. या अभूतपूर्व सोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्याबद्दल महामहिम राष्ट्रपती महोदया यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. नाशिक ही प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, तर त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र. गोदावरी मातेचा उगम, रामायणाचा वारसा आणि संत-महंतांच्या तपश्चर्येने पवित्र झालेली ही भूमी भारतीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे अद्वितीय प्रतीक आहे. त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून भारताच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा, एकात्मतेचा आणि सनातन परंपरेचा वैश्विक उत्सव आहे.

आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय सौ. सुनेत्राताई पवार, मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व लोकप्रतिनिधी, तेरा आखाड्यांचे परमपूज्य साधू-महंत, तीर्थपुरोहित आणि हजारो श्रद्धाळू भाविक उपस्थित होते. तसेच हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल आणि विविध यंत्रणांमधील प्रत्येक घटकाचे मी मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
निवृत्तीला फक्त दोनच दिवस बाकी, पण पैशांचा मोह नडला, 80 हजारांची लाच मागितली, मालेगाव महापालिका आयुक्तांवर कारवाई 
निवृत्तीला फक्त दोनच दिवस बाकी, पण पैशांचा मोह नडला, 80 हजारांची लाच मागितली, मालेगाव महापालिका आयुक्तांवर कारवाई 
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Advertisement
Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget