एक्स्प्लोर

Mahakumbh Mahasamvad 2026: “कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..

Kumbh Mela 2027: नाशिकमध्ये ‘महाकुंभ महासंवाद’चे आयोजन; आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने विविध पैलूंवर चर्चा घडवून आणणे हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे.

Kumbh Mela 2027: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाच्या वतीने नाशिकमध्ये ‘महाकुंभ महासंवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, 28 ऑक्टोबर रोजी गेटवे हॉटेल येथे आयोजित या महासंवादात धर्म, संस्कृती, राजकारण, पर्यावरण आणि कुंभमेळ्याच्या नियोजनासह विविध विषयांवर मान्यवर आपले विचार मांडत आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी, भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले आणि अखिल भारतीय हिंदू महासभेचे अनिकेत शास्त्री देशपांडे सहभागी झाले होते. यावेळी तुषार भोसले यांनी कुंभमेळा, राजकीय श्रेय आणि सामाजिक ऐक्य या विषयांवर आपली भूमिका मांडली.

महाराष्ट्रातील कारस्थानी राजकीय मंडळींचे प्रयत्न - तुषार भोसले

कुंभमेळ्याच्या आयोजनावरून होणाऱ्या राजकीय चर्चेचा उल्लेख करताना भोसले म्हणाले की, महाराष्ट्रातला महाकुंभ इतक्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने, देशातील साधू-संत असतील किंवा भाविक असतील, हे लोक आयोजन करत असलेल्या सत्तेला श्रेय देणारच, पण महाराष्ट्रात असे काही कारस्थानी राजकीय मंडळी देखील आहेत. त्याचे श्रेय संबंधित लोकांना मिळू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतात, त्यासाठी आतापासूनच वेगळी व्यवस्था निर्माण करायला घेतली आहे, यासाठी काही राजकीय मंडळी प्रयत्न करत असून कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी होणाऱ्या खर्चावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. .

‘दुष्काळ आणि आपत्तीच्या काळातही कुंभमेळ्याची परंपरा खंडित झाली नाही’

कुंभमेळ्याच्या खर्चावरून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांबाबत बोलताना तुषार भोसले म्हणाले की, काही जण कुंभमेळ्यासाठी खर्च होणारा निधी दुष्काळग्रस्त भागांकडे वळवण्याची मागणी करतात. मात्र, त्यांच्या मते, कुंभमेळ्याची परंपरा भारतीय सनातन संस्कृतीत अनेक शतकांपासून चालत आली आहे.“या काळात अनेक वेळा दुष्काळ आले, आपत्ती आल्या आणि युद्धाचे प्रसंगही निर्माण झाले. मात्र, आमची परंपरा कधी खंडित झाली नाही,” असे भोसले म्हणाले. कुंभमेळा रद्द करण्याच्या चर्चेचाही त्यांनी उल्लेख केला. भारतातील हिंदू समाज आणि महाराष्ट्रातील भाविक अशा विचारांना विरोध करतील आणि महाराष्ट्राचा कुंभमेळा जागतिक स्तरावर यशस्वी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘कुंभमेळ्यात जातीभेदाला स्थान नाही’

कुंभमेळ्यातील स्नानपरंपरा आणि सामाजिक ऐक्य यांवरही तुषार भोसले यांनी भाष्य केले. त्यांच्या मते, कुंभमेळ्यातील सामूहिक स्नानाची परंपरा सामाजिक एकतेचा संदेश देते आणि येथे जातीभेदाला स्थान नसते.“कुंभमेळ्यात स्नानाच्या परंपरेत जातीभेद दिसणार नाही. एकत्रित स्नानाची परंपरा आणि सामाजिक ऐक्याची परंपरा या कुंभमेळ्याने दिली आहे. सनातन संस्कृतीत वादाला आणि भेदाला स्थान नाही,” असे भोसले म्हणाले. कुंभमेळ्याच्या परंपरेला विविध राजसत्तांनी प्राधान्य दिले आणि ती जोपासली, असेही त्यांनी नमूद केले.

पहिल्या सत्रात सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टिकोनातून चर्चा

महाकुंभ महासंवादाच्या पहिल्या सत्राची सुरुवात सकाळी 11:30 वाजता झाली. ‘सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टिकोन’ या विषयावरील या सत्रात काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी, भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले आणि अखिल भारतीय हिंदू महासभेचे अनिकेत शास्त्री देशपांडे सहभागी झाले होते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महासंवादात धार्मिक परंपरा, आध्यात्मिक महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि प्रशासकीय आव्हाने यांसारख्या विषयांवरही विविध क्षेत्रांतील मान्यवर चर्चा करत आहेत. दरम्यान, कुंभमेळ्याच्या आयोजनावरील खर्च आणि त्याच्या सामाजिक-आर्थिक प्राधान्यांबाबत तुषार भोसले यांनी मांडलेली भूमिका ही त्यांची राजकीय आणि वैचारिक मांडणी आहे. कुंभमेळ्याचे नियोजन, निधीचा वापर आणि भाविकांसाठीच्या सुविधांबाबत प्रशासनाची अधिकृत भूमिका स्वतंत्रपणे महत्त्वाची ठरणार आहे. 

हेही वाचा : 

Sankashti Chaturthi 2026: 29 कि 30 ऑक्टोबर..यंदा संकष्टी चतुर्थीला विशेष योगायोग! चंद्रोदय वेळ, 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व...

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शक्तीचं प्रतिक म्हणजे कुंभमेळा, इथं येऊन मला प्रसन्न वाटलं : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 
सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शक्तीचं प्रतिक म्हणजे कुंभमेळा, इथं येऊन मला प्रसन्न वाटलं : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Advertisement
Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Embed widget