एक्स्प्लोर

Kalicharan Maharaj on BJP Nagarsevak Tushar Apte: भाजपने लैंगिक अत्याचार प्रकरणातील तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केलं, कालीचरण महाराज संतापले, म्हणाले, 'भरचौकात त्याचं मुंडकं छाटा'

Kalicharan Maharaj on BJP Nagarsevak Tushar Apte: बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक करण्यात आले आहे. यावर कालीचरण महाराजांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय.

Kalicharan Maharaj on BJP Nagarsevak Tushar Apte: बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार  (Badlapur School Sexual abuse) प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. या बहुचर्चित प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे (Tushar Apte) यालाच भाजपने (BJP) कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केले आहे. यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. आता या प्रकरणावर कालीचरण महाराजांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.   

आज शनिवारी (दि. 10) नाशिकमध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी कालीचरण महाराज नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपने स्वीकृत नगरसेवक केलं, याबाबत विचारले असता कालीचरण महाराज म्हणाले की, त्याला भर चौकात उभं करून मुंडके छाटले पाहिजे. कालीचरण महाराजांना अर्पण केलं पाहिजे. आरोप सिद्ध होत असतील तर कारवाई झालीच पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

Kalicharan Maharaj: जे धर्म रक्षण करतात त्यांना मतदान करा

नाशिकमधील उमेदवारांच्या प्रचाराबाबत विचारले असता कालीचरण महाराज म्हणाले की, आमचा उद्देश धर्म राज्याचा आहे.  जो हिंदू हिताचे आचरण करेल त्याला मतदान करा. दोन असतील तर जो जास्त हिंदू आचरण करेल त्याला मतदान करा. लोकांनी आपापल्या अनुभवावर उमेदवारांना निवडावे. हिंदूंचे विभाजन होत आहे. जे धर्म रक्षण करतात त्यांना मतदान करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. 

Kalicharan Maharaj: हिंदू वोटर करणे हा आमचाच अजेंडा

बांगलादेशमध्ये हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. याबाबत विचारले असता कालीचरण महाराज म्हणाले की, कोणत्याही देशात हिंदू सुरक्षित नाही. ही स्थिती भारतात देखील होऊ शकते. हिंदूंच्या रक्षणासाठी राजकारणाचे हिंदुकरण करणे महत्वाचे आहे. हिंदू वोटर करणे हा आमचाच अजेंडा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

Kalicharan Maharaj: भाजप आणि शिवसेनेला मतदान करा

जो भारत मातेचा महोत्सव करेल, त्याला मतदान करा. पाकिस्तानचा महोत्सव करेल त्याला नका करू. भाजप आणि शिवसेनेला मतदान करा. गोमाता, मठ, मंदिर, संतांची सुरक्षा करतील त्यांना मतदान करा. जातीवाद करणाऱ्यांना वोट करू नका. हिंदू स्वराज्याचा विडा उचलून काम करायला हवे. जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद सोडून धर्मध्वज जपण्यासाठी एकत्र यायला हवे. तरच हिंदू सुरक्षित राहतील, असे देखील कालीचरण महाराजांनी म्हटले आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Badlapur BJP Tushar Apte: लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेला भाजपने नगरसेवक केलं, अविनाश जाधव आक्रमक, मनसेकडून बदलापूरमध्ये मोर्चाची हाक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
Akola News : कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
Nanded Municipal Election 2026: 'एक वेळेस संधी द्या, वर्षभरात विकास झाला नाही तर राजीनामा देईन'; ठाकरे गटाच्या महिला उमेदवाराकडून थेट शासकीय बाँडवर हमी!
'एक वेळेस संधी द्या, वर्षभरात विकास झाला नाही तर राजीनामा देईन'; ठाकरे गटाच्या महिला उमेदवाराकडून थेट शासकीय बाँडवर हमी!
Kolhapur Municipal Corporation Election: 'निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही' कोल्हापुरात 'आप' राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचे मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
'निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही' कोल्हापुरात 'आप' राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचे मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
Akola News : कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
Nanded Municipal Election 2026: 'एक वेळेस संधी द्या, वर्षभरात विकास झाला नाही तर राजीनामा देईन'; ठाकरे गटाच्या महिला उमेदवाराकडून थेट शासकीय बाँडवर हमी!
'एक वेळेस संधी द्या, वर्षभरात विकास झाला नाही तर राजीनामा देईन'; ठाकरे गटाच्या महिला उमेदवाराकडून थेट शासकीय बाँडवर हमी!
Kolhapur Municipal Corporation Election: 'निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही' कोल्हापुरात 'आप' राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचे मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
'निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही' कोल्हापुरात 'आप' राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचे मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
Donald Trump on Venezuela Crude Oil: राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून उचलून व्हेनेझुएलाच्या तेलावर डोनाल्ड ट्रम्पकडून कब्जा, आता तेच तेल भारताला द्यायची तयारी!
राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून उचलून व्हेनेझुएलाच्या तेलावर डोनाल्ड ट्रम्पकडून कब्जा, आता तेच तेल भारताला द्यायची तयारी!
'चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक करत भाजपनं इनाम दिलं का? 1500 रुपयात आया बहिणींची अब्रू विकत घेताय का?' संजय राऊत भाजप, फडणवीसांवर बरसले
'चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक करत भाजपनं इनाम दिलं का? 1500 रुपयात आया बहिणींची अब्रू विकत घेताय का?' संजय राऊत भाजप, फडणवीसांवर बरसले
O Romio Teaser: रक्ताने माखलेला चेहरा, भयानक हास्य...शाहिद कपूरचा खूंखार अवतार धडकी भरवणारा, टिझर पाहिलात?
रक्ताने माखलेला चेहरा, भयानक हास्य...शाहिद कपूरचा खूंखार अवतार धडकी भरवणारा, टिझर पाहिलात?
Mamata Banerjee ED Protest: गेल्या सात वर्षांपासून सातव्यांदा सीएम ममता बॅनर्जीनी पश्चिम बंगालमध्ये ED ला घेतलं शिंगावर; थेट पोहोचल्या हायकोर्टात, अमित शाहांना चॅलेंज देत म्हणाल्या..
गेल्या सात वर्षांत सातव्यांदा सीएम ममता बॅनर्जीनी पश्चिम बंगालमध्ये ED ला घेतलं शिंगावर; थेट पोहोचल्या हायकोर्टात, अमित शाहांना चॅलेंज देत म्हणाल्या..
Embed widget