Jitendra Awhad Speech : हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनी लोकांना कळेल की काय मिळालं? मराठा ओबीसी वाद पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओबीसींच्या आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, ही आमच्या नेत्यांची भूमिका आहे.  ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये , ही भूमिका आम्ही व्यासपीठावरून जाहीर करतो, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नाशिक (Nashik) येथे आयोजित राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Faction) शिबिरातून ते बोलत होते.   

Continues below advertisement

जितेंद्र आव्हाड भाषणात म्हणाले की, ओबीसी विरुद्ध मराठा हा अतिशय संविधानशील विभागाला हात लावत आहे. कोणाच्या हातात काय? कोणी काय गमावले? काहीच समजत नाही. मात्र दोन्ही समाज अस्वस्थ करण्यात यश आलं आहे. काल भुजबळ साहेबांबाबत बोलले गेलं, त्यांच्या पोटात, गळ्यात लाथ मारा आणि मंत्रिमंडळातून हाकलून द्या. याचा मी निषेध करतो. कोण कुठला आमदार? एका समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याबद्दल असं बोललं गेलं. मंत्रिमंडळातून बाहेर काढा. मात्र अशा ज्येष्ठ नेत्याचा, ज्येष्ठ मंत्राचा अपमान राज्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही. आपलं राजकीय व्यासपीठ वेगळं असेल. पण, आपली संस्कृती, पवार साहेबांची संस्कृती आजही आठवते. गोपीनाथ मुंडे यांनी पवार साहेबांवर टीका केली. त्यावेळी वातावरण तापण्यासारखे झाले. रात्री अडीच, तीन वाजता पोलिसांची बैठक घेऊन गोपीनाथ मुंडेंची सुरक्षा व्यवस्था तीन पट करण्याचा आदेश त्याच रात्री पवार साहेबांनी घेतला होता.  ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये , ही भूमिका आम्ही व्यासपीठावरून जाहीर करतो, असे त्यांनी म्हटले. 

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, RSS गुजरातमध्ये स्थापन झाले नाही, तर महाराष्ट्रात झाले आहे. गांधीची हत्या करणाऱ्या महाराष्ट्रत जन्माला आला आहे. हैद्राबाद गॅझेटवर ST चे अधिकारी नाही. गॅझेट लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनी लोकांना कळेल की काय मिळालं? भुजबळ ओबीसी समाजाचे नेते आहेत. सरकारमधील नेते जर बोलत नसतील तर ओबीसींचे काय हाल आहेत.  मराठा ओबीसी वाद पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जमीनदार मराठा आज अल्पभूधारक झाला. आरक्षण कोणा एकासाठी येत नाही. मराठा समाजासाठी आम्ही सोबत राहू.  ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, ही आमच्या नेत्यांची भूमिका आहे, असे त्यांनी म्हटले.  

Continues below advertisement

मराठा-ओबीसी मुद्दा पेटवण्याचे काम

इतरांनाही आरक्षण द्या, आम्ही तुमच्यासोबत लोकसभेत उभे राहू. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत आणाल तर आमचे खासदार तुमच्यासाठी उभे राहतील. मराठा-ओबीसी वाद लावण्यात सरकार यशस्वी झालं आहे. ओबीसी 63 टक्के आहे. त्यासाठी जातीय जनगणना हा निर्णय घेतला. बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतला. मराठा-ओबीसी मुद्दा पेटवण्याचे काम सुरू आहे, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर केलाय. 

आणखी वाचा 

Sharad Pawar on Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे हात असल्याच्या आरोपावर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, आमचा कवडीचाही..