एक्स्प्लोर

मातंग समाज कधीही अस्पृश्य नव्हता, एकनाथ शिंदे यांच्यासारखे पाच जण जरी आले तरी उपवर्गीकरण होऊ देणार नाही; सदावर्तेंचा निर्धार

Sadavarte On Eknath Shinde Matang Samaj : मातंग समाज कधीही अस्पृश्य नव्हता, असे वक्तव्य अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलं असून 48 तासांत उपवर्गीकरण रद्द करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे.

नाशिक : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण आता तापलं आहे. या मुद्द्यावरून आता अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरले आहेत. मातंग समाज हा कधीही अस्पृश्य नव्हता, हलगी वाजवणारे अस्पृश्य कसे? असा सवाल सदावर्तेंनी विचारला आहे. तसेच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करून दाखवा, ते 48 तासात रद्द करून दाखवतो, असं आव्हानही सदावर्तेंनी दिलं आहे. सदावर्ते यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं, लोकसंख्येप्रमाणे आरक्षणात लाभ मिळावा, अशी मागणी काही जातींमधून करण्यात येत आहे. त्याला विरोधही होताना दिसतोय. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही या मुद्द्यावरून विरोधाचा सूर लावला आहे.

Gunaratna Sadavarte Speech Nashik : 'एकनाथ शिंदेंनी दळभद्री राजकारण करू नये'

मातंग समजाला आवाहन आहे तुम्ही कोणाचाही नादी लागू नका, असं म्हणत सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, "खतगावकर नावाच्या गृहस्थाला एकनाथ शिंदे यांनी विधानसभेची उमेदवारी दिली होती. तो त्या आधी अधिकारी होती. एकनाथ शिंदे यांनी त्यांचं राजकारण सोपं व्हावं म्हणून मराठा समाजासोबत मातंग समाजाला घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारखे पाच जण जरी आले तरी वर्गीकरण होऊ देणार नाही. एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, त्यांनी दळभद्री राजकारण करू नये. दुसरे शरद पवार होण्याचे प्रयत्न करू नये.

Triple Test SC Sub Classification : 'मातंग समाज अस्पृश्य नव्हता'

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, "मातंग समाजाच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही सोबत होतो. मातंग समाज अनुसूचित जातीतच राहू शकत नाही. मातंग समाज कधीही अस्पृश्य नव्हते. त्या काळात हलगी वाजवून काम कोण करत होते? संविधान म्हणते ट्रिपल टेस्ट करा. ही टेस्ट झाली तर मातंग समाज अनुसूचित जातीच्या समूहातून बाहेर होतील. या यादीमध्ये 59 जाती आहेत. त्यापैकी 58 जाती एका बाजूला आणि एक जात एका बाजूला आहे."

Sadavarte Challenge To Government : 'उद्या 3 वाजेपर्यंत उपवर्गीकरण स्थगित करून दाखवणार'

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते पुढे म्हणाले की, "अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचे राजकारण सुरू आहे. डंके की चोट पे सांगतो, हे उपवर्गीकरण होऊ देणार नाही. आमचा नाद करायचा नाही. गवई साहेबांच्या नावाने हलगी वाजावतात, पण गवई यांनी रिपोर्टमध्ये काय लिहिले आहे? हा काळ आंबेडकरवादी विचारांचा आहे. इथे कॉम्प्रमाईज केले जाणार नाही. उद्या 3 वाजेपर्यत उपवर्गीकरण स्थगित करून दाखवणार. सदावर्ते हा संविधानाचा पहिलवान आहे."

उपवर्गीकरणावरून राज्यभरात विविध संघटनांमध्ये वाद निर्माण झाला असताना, सदावर्ते यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Drought: डोळ्यांसमोर पिकं वाळली, जनावरांसाठी चारा-पाणी नाही; बळीराजावर 'कृषीधन' विक्रीची वेळ, दुष्काळाचं भीषण वास्तव
डोळ्यांसमोर पिकं वाळली, जनावरांसाठी चारा-पाणी नाही; बळीराजावर 'कृषीधन' विक्रीची वेळ, दुष्काळाचं भीषण वास्तव
धक्कादायक! मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेले, जीव गमावून बसले, नाशिकच्या कजवा़डे धरणात बुडून तिघांचा मृत्यू
धक्कादायक! मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेले, जीव गमावून बसले, नाशिकच्या कजवा़डे धरणात बुडून तिघांचा मृत्यू
Nida Khan: 8 महिन्यांची गर्भवती निदा खानसमोर नवं संकट; गंभीर गुन्ह्यांत जामीन मिळाला, पण आता पतीने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली
8 महिन्यांची गर्भवती निदा खानसमोर नवं संकट; गंभीर गुन्ह्यांत जामीन मिळाला, पण आता पतीने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली
FDA : नाशिकच्या FDA मधील 5 अधिकारी रडारवर; राज्यातील 12 जणांवर निलंबनाची टांगती तलवार, नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या FDA मधील 5 अधिकारी रडारवर; राज्यातील 12 जणांवर निलंबनाची टांगती तलवार, नेमकं प्रकरण काय?
Advertisement

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Advertisement
Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
Raigad Crime News: 'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
Embed widget