Girish Mahajan :  पालकमंत्री असो वा नसो मी नाशिकमध्ये हजर असतो असे मत मंत्री गिरीश महाजन  (Girish Mahajan) यांनी व्यक्त केले. त्र्यंबकेश्वरला होतो, पाऊस आला मी हजर असतो. मी कुठेही कमी पडलो नाही असे महाजन म्हणाले. पालकमंत्र्यांची कमी भासू देणार नाही असेही ते म्हणाले. येणाऱ्या सहा महिन्यात नाशिकमधील सगळी कामे पूर्ण होतील, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला. 

Continues below advertisement

पैसे आणि परवानगीची चिंता करु नका, तत्काळ परवानगी देतो, कॉलनीमधील रस्ते तत्काळ रिपेअर करा अशा सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत. पोलिस यंत्रणेला अलर्ट राहवे लागेल. फार दिवस नाशिककरांना त्रास होणार नाही. आता पुन्हा जास्त पाऊस सांगितला आहे. अधिकाऱ्यांची मोठी जबाबदारी आहे. काम सुरु आणि अधिकारी नाही असे नको. अधिकारी स्पॉटवर पाहिजे. आता खपवून घेतले जाणार नाही असा इशाराच महाजन यांनी दिला. 

कुंभमेळा एक वर्ष राहिल्याने कामांची घाई सुरु

नाशिककरांना कमीत कमी त्रास होईल, यापुढे काळजी घ्या. कुंभमेळा एक वर्ष राहिला कामांची घाई आहे असेही महाजन म्हणाले. सर्व ठेकेदांना उद्याच्या बैठकीला बोलवा, त्यांना बंद खोलीत काय सांगायचे मी सांगतो, आता खपवून घेणार नाही असे महाजन म्हणाले. 30 आणि 35 टक्के टेंडर बिलो जाऊन कसे दर्जेदार कामे होतील. उद्याच्या उद्या मी सर्वांशी बोलणार आहे. हे तपासले जात नाही, काही टेंडर रिजेक्ट करा मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि यात काय करता येईल ते बघू असेही महाजन म्हणाले. 

Continues below advertisement

 येणाऱ्या सहा महिन्यात नाशिकमधील सगळी कामे पूर्ण होतील

कुंभमेळा मंत्री मी आहे, त्यामुळं जबाबदारी माझी आहे असे महाजन म्हणाले. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे झाली होती का? असा सवाल देखील त्यांनी केला. नाशिककरांना त्रास होणार आहे हे मी सांगितले होते. डांबरी रस्ते टिकत नाही, व्हाइट टॉपिंग करत आहोत. चाळीस हजार कोटी खर्च करून चेहरा मोहरा बदलत आहोत असे महाजन म्हणाले. एका रोडखाली सात प्रकारची युटिलिटी करत आहोत. सुविधा मिळणार आहेत. नवीन नाशिक आपण करत आहोत.  मॉडर्न नाशिक आपण करत आहोत. येणाऱ्या सहा महिन्यात कामे पूर्ण होतील. नाशिककर म्हणतील आमच्या शहरासारखे शहर नाही असा विश्वास महाजनांनी व्यक्त केला. मुरुम टाकू नका, अशा सूचना दिल्या आहेत. आता कुणाची हयगय केली जाणार नाही असेही ते म्हणाले.  आता सूचना दिल्या आहेत. उद्या कामाला सुरुवात करा.  खड्डे बुजवा असेही त्यांनी सांगितले. 

व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिपप्रकरणी बोलताना महाजन म्हणाले की, त्यांना पार्टीतून काढून टाकलं आहे. ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहे. अनेकांच्या क्लिप रेकॉर्ड केल्या आहेत. आता त्यांचा काही संबंध नाही असेही महाजन म्हणाले.