Nashik Lok Sabha Constituency : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी चार दिवसांपूर्वीच नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर समता परिषदेने आज भुजबळ फार्मवर (Bhujbal Farm) बैठक आयोजित केली होती. उमेदवारीबाबत छगन भुजबळ जो निर्णय घेतील तो सर्वाना मान्य असेल, असा ठराव बैठकीत करण्यात आला. 


यानंतर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. आता मी निर्णय घेतला आहे, त्यावर मी कायम आहे. मी महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्या प्रचारासाठी काम करणार, नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. 


नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा कायम


मी आयुष्यात एकदा मुंबई मनपा नगरसेवकाच्या उमेदवारीचे तिकिट मागितले होते. त्यानंतर पुन्हा तिकीट मागितले नाही. मी कायम तिकीट वाटपाचे काम केले आहे. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) दावा अद्याप ही कायम आहे. देविदास पिंगळे, माणिकराव कोकाटे असे अनेक नावे आहेत. भाजपकडे काही उमेदवारीची कमी नाही. शिंदे गटाकडेही खूप उमेदवार आहेत. काहींना वाटते भुजबळ आल्याने मत कमी मिळणार आहेत. मात्र मराठा समाजाच्या उमेदवाराने मला बोलवले आणि माझ्यामुळे त्यांचे मत कमी होणार नाही, असे वाटत असेल तर मी प्रचाराची जाणार आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. 


हेमंत गोडसेंनी गोड बातमी द्यावी - छगन भुजबळ 


नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातच आज मध्यरात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांच्या गुप्त बैठक झाली. प्रचाराला कमी दिवस उरल्यानं बोरस्ते यांना थांबवून गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहेत. यावर भुजबळ म्हणाले की, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा. समोरच्या राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर होऊन बराच कालावधी गेला आहे. त्यांच्या प्रचाराची एक फेरीदेखील पूर्ण झाली आहे. हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार असेल तर त्यांनी गोड बातमी द्यावी, असे असे हसत हसत भुजबळ म्हणाले. 


मी मराठा आरक्षणाच्या विरोधात नव्हतो - छगन भुजबळ 


नाशिकच्या उमेदवारीला वेळ का लागतो, हे वरिष्ठ पातळीवरील प्रश्न आहेत, त्यांना विचारा. मी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विरोधात नव्हतो. ओबीसीमधून आरक्षण नको या मतावर आजही कायम आहे. त्यापुढे उमेदवारी, मंत्रिपद काहीच नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता असतानाच शांतीगिरी महाराजांकडून महायुतीला इशारा, ताकद दाखवत पत्रकच केलं जारी