Nashik News :  नाशिकमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आनंदशाळा समारंभाचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते झाले उद्घाटन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची (New Education Police) जूनपासून जे अंमलबजावणी करणार नाहीत त्यांची मान्यता विद्यापीठ काढून घेणार, असा इशारा शिक्षण संस्थाचालकांना दिला आहे. तुम्ही सुधरा, दम देत नाही पण प्रेमाचा सल्ला समजा, असे त्यांनी म्हटले आहे. 


आज नाशिकमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आनंदशाळा समारंभाचे उद्घाटन केबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे पार पडले. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शिक्षण संस्थाचालकांना इशारा दिला आहे.  


काय म्हणाले चंद्रकांत पाटील?


पुण्यात फ्लेम युनिव्हर्सिटीत 13 लाख वार्षिक फी आहे, ऍडमिशन मिळत नाही तिथे माझ्यासारख्याची चिट्ठी द्यावी लागते, ऐकत नाहीत. मालक शहा माझे मित्र आहेत. त्यांनी 100 एकरात 800 कोटी रुपये खर्च केले आहे. मुलींना मोफत शिक्षणाबाबत कॅबिनेट निर्णय झाला आहे. आता जी आर निघेल. तुम्ही सुधरा, सुधारा नाही म्हणत सुधरा म्हणतोय जरा ग्रामीण भागातला शब्द आहे. सुधरा नाहीतर कॉलेजेस बंद करा.  


आम्ही दम देत नाही, प्रेमाचा ग्रामीण तरुण म्हणून सल्ला देतोय


जूनमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाला पर्याय नाही.  ज्यांना या धोरणाची जूनपासून अंमलबजावणी करायची नसेल त्यांची मान्यता विद्यापीठ काढून घेईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. ज्या विद्यापीठाला ममता बॅनर्जींसारखे बंड वाटत असेल, आम्ही करणार नाही, अशी त्यांची भूमिका असेल तर त्या विद्यापीठाची मान्यता रद्द होईल. आम्ही दम देत नाही, प्रेमाचा ग्रामीण तरुण म्हणून सल्ला देतोय, असे त्यांनी म्हटले आहे. 


पिंपरी चिंचवड आणि पुणे ही वन सिटी होईल - चंद्रकांत पाटील


दरम्यान, नाशिकमध्ये चंद्रकांत पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, मेट्रोचा रामवाडी स्टेशनचा ट्रॅक पूर्ण झाला आहे.  मोदींनी वेळ दिला नाही असे काही नाही, काही टेक्निकल अडचणी आल्या होत्या. भूसंपादनाच्या अडचणी होत्या, लोकांनी पण विकासकामात अडथळे आणून चालणार नाही. आता मोदींनी पण उद्घाटनाला येण्याचे मान्य केले आहे, त्यांचे मी स्वागत करतो.  नवीन ट्रॅक जे संक्शन झाले आहे. तो डीपीआर दिल्लीला गेला आहे. 22 किमी पूर्ण होईल. पुढचा टप्पा पण 22-25 किमीचा असेल. जवळजवळ 30-40 टक्के पॉप्युलेशन मेट्रोवर शिफ्ट होईल. पुढच्या काळात पिंपरी चिंचवड आणि पुणे ही ट्वीन नाही तर वन सिटी राहील, असे त्यांनी म्हटले आहे.  


आणखी वाचा 


Gautam Gambhir : गौतम गंभीरने घेतलेल्या घेतलेल्या तडकाफडकी निर्णयाने दिल्लीसह क्रिकेट जगतात भूकंप!