Ashok Kharat Viarl Video : महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक मंत्री, बडे अधिकारी, राजकीय नेते, सेलिब्रिटी या भोंदूबाबा अशोक खरातचे भक्त होते. अशोक खरात नाशिकच्या मीरपूर येथील ईशानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलावायचा. त्या ठिकाणी भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्ये करुन खरात त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा, अशीही माहिती समोर आली आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्याची खरातला लागली कुणकुण- (Ashok Kharat Viral Video)
भोंदूबाबा अशोक खरातला अटक होण्याआधीच त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची कुणकूण लागली होती. या प्रकरणातील पीडितांनी खरातवर कारवाई करण्यासाठी एका आमदाराची भेट घेतली होती. मात्र पीडितांच्या हाती निराशा पडली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानावर हे प्रकरण गेल्यानंतर त्याला वाचा फुटली. व्हिडीओ दाखवत पीडित कुटुंबानं आमदाराला आपबीही सांगितली. मात्र संबंधित आमदारानं या प्रकराला वाचा फोडण्याऐवजी उलट खरातलाच तक्रारीविषयी माहिती दिली. त्यामुळे प्रकरण दडपण्याच्या उद्देशानं खरातनं पीडितेच्या पतीवर गुन्हा दाखल केला. मात्र पीडितांनी हार न मानता दुसऱ्या आमदाराची भेट घेतली आणि संबंधित आमदारानं मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे प्रकरण घातलं आणि त्यानंतर या सर्व अत्याचारकांडांला वाचा फुटली. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
अशोक खरातप्रकरणी एसआयटी चौकशीला वेग- (Ashok Kharat Case Marathi News)
अशोक खरातप्रकरणी एसआयटी चौकशीला वेग आला आहे. डिजिटल आणि फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात झाली. फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू झालं आहे. आर्थिक व्यवहार, खरातचं नेटवर्क तसंच सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. अशोक खरातने पाथर्डी गवळाणे, सिन्नर आणि शिर्डी, ओझर परिसरात कोट्यवधींची गुंतवणूक केल्याची माहिती आहे. दरम्यान यासंदर्भात पोलिसांकडू तपास सुरू आहे. खरातविरुद्ध दाखल तीन गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा, वावी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा, तर शिर्डी पोलीस ठाण्यात अश्लील फोटो व्हायरल केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अशोक खरातचे 100 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ- (Ashok Kharat Case Nashik Crime News)
अशोक खरातचे सुरुवातीला 58 आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्याची माहिती मिळाली होती. परंतु आता महिलांच्या लैंगिक शोषणाचे 100 हून अधिक व्हिडिओ असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या व्हिडिओमधून ‘तांत्रिक विधी’ आणि दैवी शक्तींच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचे समोर येत आहे.
कोण आहे अशोक खरात? (Who Is Ashok Kharat)
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. 'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.
अशोक खरातच्या त्या व्हिडिओची कुणकुण कशी लागली?, VIDEO
