Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या (Ashok Kharat) काळ्या कारनाम्यावरून महाराष्ट्र हादरला आहे. या अशोक खरातची आज तिसऱ्या दिवशीही एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. गेल्या 6 तासांपासून अशोक खरातची चौकशी सुरू आहे. विशेष तपास पथक प्रमुख तेजस्विनी सातपुतेंकडून चौकशी सुरू आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

पोलिसांकडून अशोक खरातचं कार्यालय तसंच इतर कागदपत्रं तपासणी करत सबळ पुरावे गोळा करण्यात येत आहेत. महिलांना भोंदू अशोक खरात कशा पद्धतीने जाळ्यात अडकवत होता याचा सखोल तपास केला जात आहे. याचदरम्यान, तपासात विविध माहिती समोर येत आहे. भोंदू अशोक खरात भक्तांना रबरी साप आणि नकली वाघाचं कातडं दाखवून घाबरवायचा. अशोक खरातच्या मिरगावच्या मंदिरात ही भयशाळा चालायची. राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे इकडेच फसल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे अनेकांना खरातकडे दैवी शक्ती असल्याचा भास निर्माण होत असे. काही जण भीतीने बेशुद्ध पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. प्रत्यक्षात हा सगळा प्रकार पूर्वनियोजित आणि बनावट असल्याचे समोर येत आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलावायचा- (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरात नाशिकच्या मीरपूर येथील ईशानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलावायचा. त्या ठिकाणी भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्ये करुन खरात त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा. इतकंच नाही तर या नराधमाने चिंचोके विकून लोकांना वेड्यात काढलंय. भोंदूबाबा अशोक खरात एकेक चिंचोका 1 लाख रुपयांना विकत होता. चिंचोके मंत्रोच्चारीत असल्याची बतावणी खरात भक्तांना करायचा. अशोक खरातच्या निकटवर्तीयाच्या एफआयआरमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. (Ashok Kharat Case)

कोण आहे अशोक खरात? (Who Is Ashok Kharat)

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. 'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.

नेमकं प्रकरण काय? (Nashik Ashok Kharat Case)

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.