Anjali Damania on Girish Mahajan: तपोवन परिसरातील वृक्षतोडीला (Nashik Tapovan Tree Cutting) राज्यभरातून विरोध होत असतानाच नाशिक महापालिकेने चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी तब्बल 1270 झाडे तोडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
Anjali Damania on Girish Mahajan: नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया?
अंजली दमानिया म्हणाल्या की, एवढा विरोध होत आहे तरी गिरीश महाजनांना एवढी मस्ती की, त्यांनी नाशिकचे झाडं तोडली. लोकांनी आंदोलन करा, आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार असे ते आहेत. गिरीश महाजन यांना लक्षात ठेवा. राजकारणातून त्यांना फेकून द्या, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केलाय.
Nashik Tree Cutting: नाशिक महापालिकेचे स्पष्टीकरण
नाशिक महापालिकेच्या पंचक, चेहडी, आगार टाकळी आणि तपोवन येथील चार मलनिस्सारण केंद्रांच्या विस्तारीकरणासाठी एकूण 1728 झाडे तोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्यापैकी 458 झाडे वाचवण्यात आली. उर्वरित 1270 झाडे तोडण्यात आली आहे. वृक्षतोडीच्या बदल्यात महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाकडून 1 कोटी 76 लाख रुपये भरपाई म्हणून स्वीकारण्यात आली. या निधीचा वापर पर्यावरणीय भरपाई प्रकल्पांसाठी होणार आहे. त्याचबरोबर फाशीच्या डोंगराजवळ 17,680 नव्या झाडांची लागवड करण्यात आली असून, या रोपांमध्ये स्थानिक प्रजातींचा समावेश असल्याचे स्पष्टीकरण नाशिक महापालिकेने दिले आहे.
Nashik Tree Plantation: नाशिकमध्ये 15 हजार वृक्षांची लागवड होणार
दरम्यान, तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य 1800 वृक्षतोडीबद्दल शहरात तीव्र विरोध सुरू असताना, राज्य सरकारने शहरात वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. याच मोहिमेअंतर्गत राजमुद्री येथून आणलेली झाडे आता टप्याटप्याने नाशिकमध्ये दाखल होऊ लागली असून पहिला ट्रक नाशिकमध्ये दाखल झाला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच दक्षिण भारतातील राजमुद्री येथे भेट देत झाडांची निवड केली. सुमारे 15 फूट उंचीची 15 हजार देशी झाडे वड, पिंपळ, निंब, जांभूळ, आंबा आदींचा समावेश आहे. ठिबक सिंचन प्रणालीसह जैविक खतांचा वापर करून मनपा उद्यान विभागाकडून झाडांच्या देखभालीची व्यवस्था केली जाणार आहे. सोमवारपासून गिरीश महाजनांच्या उपस्थितीत वृक्षलागवड मोहिमेला औपचारिक सुरुवात होणार आहे.
आणखी वाचा