Sanjay Raut Tweet : 'एक वेळ अशी आली की घाणेरडे आरोप प्रत्यारोप झाले, त्यावेळी राजकारणाची उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तेच केले आहे., अशा शब्दांत संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर ट्वीट केले आहे. शिवाय 'भाकरी फिरवण्याचे संकेत होते... पण तवाच फिरवला... अशा आशयाचे दुसरे ट्वीट संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.


शरद पवारांचं (Sharad Pawar) आत्मचरित्र लोक माझे सांगातीच्या (Lok Majhe Sangati) सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त करत राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनी निर्णय जाहीर केल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आणि निर्णयाला विरोध करण्यात आला. त्यानंतर शरद पवारांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी विरोध जोरदार केला. निर्णय मागे घेईपर्यंत सभागृह सोडणार नाही, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. शिवाय पवारांसमोर अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. दरम्यान शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या निर्णयासंदर्भात संजय राऊत यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. 


खासदार संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'एक वेळ अशी आली की घाणेरडे आरोप, प्रत्यारोप करण्यात आले. राजकाराणाचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत.' अशा आशयाचे ट्वीट केले आहे. त्याचबरोबर सध्याच्या चर्चेतील एक फोटो ट्वीट करत 'भाकरी फिरवण्याचे संकेत होते.. पण तवाच फिरवला' असे फोटोला कॅप्शन दिले आहे. 


दरम्यान राज्याच्या राजकारणातील महत्वाची बातमी असून शरद पवार यांच्या निर्णयाने अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध केला. तसेच सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी 'महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार' अशा घोषणा देण्यात आल्या. राजीनामा मागे घेण्यासाठी धनंजय मुंडे शरद पवारांच्य पाया पडले. राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. अनेक कार्यकर्ते या वेळी भावूक झाले आहेत. सभागृहात मोठा गोंधळ उडला आहे. शरद पवारांच्या भोवती मोठी गर्दी जमली. ही गर्दी सावरण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) स्टेजवर गेले. कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती केली आहे. शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर अजित पवार म्हणाले,"समिती ठरवेल तो निर्णय पवारांना मान्य असेल. मात्र निर्णय आजच घ्यावा असा कार्यकर्त्यांनी आग्रह केला".


काय म्हणाले शरद पवार?


शरद पवारांचं (Sharad Pawar) आत्मचरित्र लोक माझे सांगातीच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शरद पवार म्हणाले,"राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मी घेतला आहे. संघटनेच्याबाबत पुढं काय करायचं याबाबत मी एक समिती करणार असून यात सदस्य निर्णय घेतील. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, दिलिप वळसे पाटील, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी निर्णय घ्यावा. मी कुठही असलो तरी सकाळपासून मी संध्याकाळ पर्यंत उपलब्ध राहिलं हे आश्वस्थ करतो".