Nashik News नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), माजी आमदार पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) यांच्या ‘प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवास’ या संकल्पनेतून येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येत रामलल्लाचे दर्शन (Ayodhya Ram Mandir) घडविण्यात येणार आहे. 


प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी या प्रवासासाठी 'पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेस'ची (Panchvati Ayodhya Astha Express) व्यवस्था करण्यात आली आहे. या पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकात (Manmad Railway Station) मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखविणार आहे.


ज्येष्ठ नागरिकांना 'पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस'ची व्यवस्था


नाशिक ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सुमारे १४ वर्षाहून अधिक काळ प्रभू रामचंद्राचे या नगरीत वास्तव्य राहिले आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्राची कर्मभूमी असलेल्या नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावे यासाठी मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना 'पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेस'ची व्यवस्था करण्यात आली आहे. 


असा असेल प्रवास


प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवासासाठी सुमारे २२ डब्यांची 'पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेस' ही दि. 6 मार्च 2024 रोजी सायंकाळी 8.10  वाजता मनमाड स्थानकातून अयोध्याकडे प्रयाण करणार आहे. त्यानंतर दि. 7 मार्च 2024 रोजी रात्री 9.30 वाजता अयोध्या येथे ही ट्रेन पोहचणार आहे. तर दि. 8 मार्च 2024 रोजी दुपारी 4.40 वाजता अयोध्या येथून मनमाडकडे प्रयाण करून दि. 9 मार्च 2024 रोजी रात्री 8 मनमाड येथे पोहचणार आहे. 


1400 ज्येष्ठ नागरिक करणार अयोध्यावारी


सुमारे 1400 ज्येष्ठ नागरिक या एक्स्प्रेसमधून प्रवास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रवासामध्ये जेवण, नाश्ता, चहा यांसह निवासाची व दर्शनाची सुविधा असणार आहे. या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक डब्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते असणार आहे. या प्रवासातील नियोजनासाठी प्रमुख 22 पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Kisan Sabha Protest : कडाक्याच्या थंडीतही नाशिकमधील शेतकरी आंदोलन सुरूच; आज तोडगा निघणार का?


Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी टप्प्याचे उद्घाटन आज, शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास होणार सुलभ, मंत्री दादा भुसे करणार लोकार्पण