Nashik Crime News : नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत चालली आहे. आता शहरातील पंचवटी (Panchavati) परिसरात किरकोळ कारणावरून एका 17 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. एका मित्राच्या वाढदिवसाच्या (Birthday) दिवशी केक भरवण्याच्या कारणावरून वाद झाला होता. याच वादातून युवकाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

Continues below advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटीतील पेठरोड कर्नल नगर येथील 17 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच मित्राच्या वाढदिवशी एकमेकांना केक भरवण्याच्या किरकोळ कारणावरून मित्रांमध्ये वाद झाला होता. हाच राग मनात ठेवून तीन अल्पवयीन मित्रांनी धारदार हत्याराने युवकाची हत्या केली.

तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे पंचवटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

Continues below advertisement

गुन्हेगारी रोखण्याचे नाशिक पोलिसांसमोर आव्हान

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही. वाहनांची तोडफोड तर आता नित्याचीच झाली आहे. खुनांच्या घटनांमध्येदेखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या गुन्हेगारीला रोखणे नाशिक पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.