एक्स्प्लोर

Nashik Accident News : गुरुपौर्णिमेनिमित्त देवदर्शनासाठी गेले, पण परतीच्या वाटेवर मृत्यूनं गाठलं; नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

Nashik Accident News : नाशिक मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्या जवळ झालेल्या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना काल (10 जुलै) दुपारी घडली.

Nashik Accident News : नाशिक मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्या जवळ झालेल्या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना काल (10 जुलै) दुपारी घडली. यात चारचाकी गाडीवर कंटेनर पलटी झाल्यानं त्याखाली गाडी दबली जाऊन त्यातील दोन महिला आणि दोन पुरुष  प्रवाश्यांचा मृत्यू झालाय. कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कंटेनर पलटी होऊन चारचाकी गाडीवर जाऊन पडला आणि काही अंतर गाडीला फरफटत नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघाताची माहिती मिळताच घोटी पोलीस, महामार्ग पोलीस, टोल नाक्याचं पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी क्रेनच्या सहाय्याने गाडीखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. 

पुढे आलेल्या माहितीनुसार, या घटनेतील सर्व रहिवासी मुबंईच्या अंधेरी परिसरातील होते. गुरुपौर्णिमा निमित्ताने एका मठात दर्शनासाठी आल्याची माहिती पुढे आली असून काळाने घाला घातल्याने सर्वत्र एकाच हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई पोलीस करत आहे.

मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या धडकेत 60 वर्षीय आजोबा ठार; 7 वर्षीय नातू गंभीर जखमी

वसई रोड येथे झालेल्या दुचाकी अपघातात 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून त्यांचा 7 वर्षीय नातू गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वसईच्या सनसिटी रोडजवळ घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघात करणारा दुचाकीस्वार मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

मृत व्यक्तीचे नाव चंद्रकांत खाखम (वय 60) असून ते वसईचे रहिवासी होते. त्यांनी नुकतीच पंढरपूर यात्रा पूर्ण करून मुंबईला परत आल्यानंतर आपल्या नातवाला भेटण्यासाठी वसई गाठले होते. बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता त्यांनी आपल्या नातवाला,  ध्रुव सिंह (वय 7) बागेत नेण्यासाठी दुचाकीने बाहेर काढले. ते दोघे सनसिटी रोडजवळ पोहोचले असताना, एका भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.

अपघातात चंद्रकांत खाखम आणि ध्रुव दोघेही रस्त्यावर पडले व गंभीर जखमी झाले. त्याचवेळी धडक देणारा दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्तीही खाली पडून जखमी झाली. सर्व जखमींना तातडीने बालाजी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र चंद्रकांत खाखम यांना उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. ध्रुवच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.

मृताच्या नातेवाईक नरेंद्र खाखम यांनी सांगितले की, “काका पंढरपूरहून परत आल्यानंतर त्यांनी नातवाला भेटण्यासाठी वेळ काढला होता. ते स्वतः दुचाकी चालवत होते, पण हेल्मेट घातले नव्हते. अपघात इतका भीषण होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला.”

या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला असून, दुचाकीस्वाराविरोधात अतिवेगात वाहन चालवून मृत्यू केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच संबंधित चालक आणि मागे बसलेल्या व्यक्तीने मद्यपान केले होते का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
Embed widget