नांदेड: नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरलं. सक्षम ताटे नावाच्या २० वर्षीय तरुणाची त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनी आणि भावांनी मिळून निर्घृण हत्या (Saksham Tate case) केली. आरोपींनी आधी त्याच्यावर गोळ्या झाडल्या त्यानंतर फरशीने डोकं ठेचून त्याला संपवलं. या हत्याकांडानंतर (Saksham Tate case) प्रेयसी आंचल मामीडवारने आपल्या वडिलांसह दोन्ही भावांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच तिने आपण सक्षमने आपल्यासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणार असल्याचं म्हटलं आहे.(Saksham Tate case)

Continues below advertisement

आंचल मामीडवारने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, १ डिसेंबरला सक्षमचा वाढदिवस होता. वाढदिवसानंतर तो मला घेऊन जाणार होता. पण वाढदिवसाच्या चार दिवस आधी त्याची हत्या करण्यात आली. मी अधिकारी बनावं, हे सक्षमचं स्वप्न होतं. यासाठी तो मला शिक्षणात मदत करत होता. आता त्याचं स्वप्न मी पूर्ण करणार, असंही आंचलने म्हटलं आहे.(Saksham Tate case)

Saksham Tate case: बहिणीचं ज्याच्यासोबत प्रेम आहे, त्याला मारून ये

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली. घटनेच्या दिवशी सकाळी आंचलचा लहान भाऊ तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेला होता. 'सक्षमविरोधात तक्रार दे,' असा दबाव तिच्यावर टाकला होता. मात्र, आंचलने पोलिसांसमोर स्पष्ट सांगितले की, तिला तक्रार द्यायची नाही. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याने आंचलच्या भावाला उद्देशून म्हटलं की, 'रोज मारामाऱ्या करून येतोस, बहिणीचं ज्याच्यासोबत प्रेम आहे, त्याला मारून ये' असे सांगितले. त्यामुळे पोलिसानेच भावाला भडकावल्याचा आरोपही आंचलने प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. तर पोलीस आणि मामीडवारच्या मित्रांनी भडकावलं, हा तुझा जावई आहे का, असे मित्र डिवचायचे. एका पोलिसाने सांगितलं याला-त्याला मारुन पोलीस ठाण्यात येण्यापेक्षा तुझी बहीण ज्याच्यासोबत फिरतेय त्याला मारुन इकडे ये, त्याशिवाय तोंड दाखवू नको असं म्हटल्याचंही आंचलने सांगितलं आहे. 

Continues below advertisement

Saksham Tate case: १८ वर्षे पूर्ण होताच तिने कोर्टात जाऊन सक्षमच्या बाजुने साक्ष दिली

विशेष म्हणजे यापूर्वी आंचलने सक्षम विरोधात बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार दिली होती. पण ही तक्रार वडील आणि भावांच्या दबाव टाकून दिली होती. १८ वर्षे पूर्ण होताच तिने कोर्टात जाऊन सक्षमच्या बाजुने साक्ष दिली होती. आता पुन्हा तिच्यावर सक्षमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव होता. पण तिने गुन्हा दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर आंचलचे कुटुंबीय तिला देवदर्शनाच्या नावाखाली आजोळी घेऊन गेले तर, दुसरीकडे आंचलचे वडील गजाजन मामीडवार आणि तिच्या दोन भावांनी सक्षमची निर्घृण हत्या केली.

आणखी वाचा -

जातीय विखारातून वडिलांनी प्रियकराला संपवलं, प्रेयसीने मृतदेहाशी लग्न केलं, अंगाला हळद अन् कपाळावर कुंकू भरलं

सक्षम नसला तरी आमचं प्रेम जिवंत, मी आयुष्यभर त्याच्या घरी राहीन; नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा मनाला चटका लावणारा शेवट