Nanded School Food: नांदेड (Nanded) जिल्ह्यातील किनवट (Kinwat) तालुक्यातील इस्लापुर गावातील जिल्हा परिषद शाळेत (Zilla Parishad School) विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात अळ्या आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना नियमितपणे दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये अळ्या आढळून आल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ याचे व्हीडिओ चित्रीकरण केले. हे व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
Nanded School Food: विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करावी
व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये अळ्या दिसून येत असून, लहान मुलांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. शालेय पोषण आहाराचा उद्देश विद्यार्थ्यांचे पोषण आणि आरोग्य सुधारणे हा असताना, प्रत्यक्षात मात्र निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. या प्रकारामुळे पालकांमध्येही तीव्र नाराजी असून, संबंधित ठेकेदार, स्वयंपाकी व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच शाळांमधील पोषण आहाराची गुणवत्ता तपासण्यासाठी नियमित तपासणी यंत्रणा सक्षम करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.
Nanded School Food: प्रशासन काय कारवाई करणार?
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व पालकांकडून होत आहे. आता प्रशासनाकडून या प्रकरणी काय कारवाई केली जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या