नांदेड: नांदेडमध्ये चोर समजून ग्रामस्थांनी एका 24 वर्षीय युवकाला मारहाण केली. बेदम मारहाणीत या युवकाचा मृत्यू झाला. नेटग्रीड प्रणालीमुळे ओळख पटल्यामुळे पुढे या प्रकरणाच्या तपासाला गती आली. नांदेडमधील हा सर्व घटनाक्रम आहे. उमरी तालुक्यातील धानोरा येथे 10 मे रोजी एका युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृतदेहाच्या शरीरावर अनेक जखमा होत्या.पंधरा दिवस उलटले तरी युवकाची ओळख न पटल्याने तपास पुढे सरकत नव्हता. अखेर अत्यंत महत्वाच्या तपासात वापरली जाणारी नेटग्रीड प्रणाली पोलीस अधीक्षकांनी परवानगी घेऊन वापरली. 

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय?

नेटग्रीडमुळे युवकाचा तपास लागला आणि तो युवक हैद्राबादमधील शेख फरदिन असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांचा शोध घेऊन पोलीसांनी तपासाला गती आली, तेव्हा धक्कादायक कारण समोर आले. 10 जून रोजी हैद्राबाद येथून तो युवक धानोरा रेल्वे स्थानकावर उतरला होता. गावात अनोळखी व्यक्ती फिरत असल्याने ग्रामस्थानी त्याला हुसकावून लावले. पुढे तो एका आखाड्यावर गेला. या ठिकाणी असलेल्या काही जणांनी त्याला चोर समजून बांधून मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अल्पवयीन आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान नेटग्रीडमुळे ओळख पटवणे शक्य झाले आणि पुढे तपास लागल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले. 

उमरी तालुक्यातील धानोरा गावात चोर समजून एक अनोळखी युवक ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. 10 मे रोजी या युवकाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडला होता. शरीरावर जखमांचे अनेक घाव होते. सुरुवातीला ओळख न पटल्यामुळे तपासात अडथळा येत होता. अखेर पोलिसांनी 'नेटग्रीड' प्रणालीचा वापर करत मृत युवकाची ओळख पटवली असून, त्यानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

नेटग्रीडमुळे मृताची ओळख पटली

सुमारे 15 दिवस मृतदेहाची ओळख पटली नाही. त्यामुळे पोलिस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 'नेटग्रीड' या अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून मृताचे ओळख पटवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामधून समजले की, मृत युवकाचे नाव शेख फरदिन असून तो हैद्राबादचा रहिवासी होता.

गावकऱ्यांनी चोर समजून घेतला जीव

10 जून रोजी शेख फरदिन हा हैद्राबादवरून धानोरा रेल्वे स्थानकावर उतरला होता. गावात तो अनोळखी वाटल्याने काही ग्रामस्थांनी त्याला संशयित समजून हुसकावून लावले. त्यानंतर तो गावातीलच एका आखाड्यावर गेला, जिथे उपस्थित काही जणांनी त्याला चोर समजून पकडले आणि त्याला बांधून बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला.

चार जणांना अटक, दोन अल्पवयीन आरोपी

या प्रकरणाचा तपास सुरू करत पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यात दोन आरोपी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अजून काही आरोपींचा शोध घेतला असून, अटकेची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पोलीस अधीक्षकांची माहिती

या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी माहिती देताना सांगितले, "मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि तांत्रिक पद्धतीचा वापर करत 'नेटग्रीड'चा आधार घेतला गेला. यामुळे तपासाला गती मिळाली आणि खरा गुन्हा उघडकीस आला."