एक्स्प्लोर

तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाकाच लावला असून मंगळवारी सायंकाळी 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

नांदेड : महाराष्ट्रातील सनदी अधिकारी आणि नुकतेच दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरुन बदली (Transfer) करण्यात आलेले आयएएस तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी दिव्यांगानी आज नांदेडच्या (nanded) जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सूरू केल्याचं पाहायला मिळालं. तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांची बदली रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून निघाला होता. विशेष म्हणजे तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर मुंबईतील मंत्रालय परिसरात देखील दिव्यांग बांधवांनी आंदोलन करत बदली रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली होती. 

राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाकाच लावला असून मंगळवारी सायंकाळी 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी, गेल्याच आठवड्यात तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून काहींना महत्त्वाच्या ठिकाणी पोस्टींग करण्यात आली असून काहींना महामंडळ व प्राधिकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तर धडाडीचे आयएएसस अधिकारी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली आहे. मात्र, दिव्यांग विभागाचे सचिव असताना दिव्यांगांसाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांनी त्यांच्यापदी आदर व्यक्त करत त्यांची बदली रद्द करण्याची मागणी केली. यापूर्वी, मंत्रालय परिसरात दिव्यांग बांधव या मागणीसाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. तर, आज नांदेडमध्ये तुकाराम मुंढेंची बदली रद्द करावी, अशी मागणी करत दिव्यांग बांधव एकत्र आले होते.  

पोलिसांचा बंदोबस्त तैनात

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आज विधिमंडळ अंदाज समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीवेळी दिव्यांग बांधव कर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या बदलीवरून आक्रमक झाल्याचं दिसून आले. त्यामुळे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. 

तुकाराम मुंढेंच्या आईचे निधन

दरम्यान, तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यामुळे, सध्या ते आपल्या मूळ गावी असून दोनच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या त्यांच्या मूळगावी आईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच, तिसऱ्या दिवशीच आईच्या अस्थींचे विसर्जन करता त्यांनी वृक्षारोपण करुन पर्यावरण आणि विवेक विचाराचा संदेश समाजाला दिला. दरम्यान, अद्याप त्यांनी नवीन बदलीच्या ठिकाणी पदभार स्वीकारला नाही.

हेही वाचा

धक्कादायक! मित्राने वाढदिवसाला बोलावलं नाही, युवकाने संपवलं जीवन; मोबाईलवर ठेवलं अखरेचं स्टेटस

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Sadabhau Khot on Tukaram Mundhe: 'नवीन युगातील तुकारामांबाबत माहिती नाही'; तुकाराम मुंढेंच्या बदलीबाबत प्रश्न विचारताच सदाभाऊ खोतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
'नवीन युगातील तुकारामांबाबत माहिती नाही'; तुकाराम मुंढेंच्या बदलीबाबत प्रश्न विचारताच सदाभाऊ खोतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Nanded Crime News: नांदेडमध्ये दोन टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून थरार! पोलिसांची मोठी कारवाई; 6 आरोपींना बेड्या, मुख्यसूत्रधार मात्र अद्याप फरार
नांदेडमध्ये दोन टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून थरार! पोलिसांची मोठी कारवाई; 6 आरोपींना बेड्या, मुख्यसूत्रधार मात्र अद्याप फरार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Sharad Pawar on Varkari: वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
BMC Budget 2026-27: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
Borivali News :रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढला; बोरीवली पश्चिममधील नाला साफसफाईचा कथित गैरप्रकार उघड, स्थानिकांचा गंभीर आरोप
रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढला; बोरीवली पश्चिममधील नाला साफसफाईचा कथित गैरप्रकार उघड, स्थानिकांचा गंभीर आरोप
Embed widget