Nagpur News: पारधी महिला अस्वच्छ असतात, आंघोळ करत नाही, त्यांच्या कुटुंबातील लोक दारूचा व्यवसाय करतात, म्हणून त्यांचे बँक खाते आमच्या बँक शाखेत नको म्हणत थेट अधिकार नाकारण्याचा कारनामा काटोलमधील बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. पारधी महिलांनी हे गंभीर आरोप लावल्यानंतर एबीपी माझाने बँकेकडून महिलांचे खाते सुलभतेने उघडण्यासाठी नेमलेल्या "बँक सखी" सोबत फोनवर संवाद साधल्यानंतर त्यांनी सुद्धा अत्यंत धक्कादायक प्रकाराला दुजोरा दिला. 

Continues below advertisement

दारूचा व्यवसाय करतात म्हणून त्यांची खाती बँकेत नकोत

एबीपी माझाने या धक्कादायक प्रकाराची माहिती जाणुन घेण्यासाठी "बँक सखी"ला फोन लावून कॉल स्पीकरवर ठेवत काॅल रेकॉर्ड केले. तेव्हा त्यांनीही काही बँक अधिकाऱ्याना या पारधी महिलांचे बँक खाते बँकेत नको आहे, पारधी महिलांचे कुटुंबीय दारूचा व्यवसाय करतात म्हणून त्यांची खाती बँकेत नकोत, अशी काही अधिकाऱ्यांची भूमिका असल्याची माहिती बँक सखीने दिली. कोणाच्या व्यवसायाशी बँकेचे काय संबंध, आपण सर्व आवश्यकडॉक्युमेंट्स पुरवणाऱ्या महिलांचे बँक खाते उघडून दिले पाहिजे, अशी विनंती केल्यानंतरही वरिष्ठ अधिकारी ऐकायला तयार नसल्याची प्रतिक्रिया बँक सखीने एबीपी माझाशी फोनवर संवाद साधताना दिली. एबीपी माझाने यासंदर्भात नागपूर जिल्हा परिषदेच्या "उमेद" योजनेअंतर्गत ग्रामीण महिलांमध्ये "उपजीविका सखी" म्हणून काम करणाऱ्या वनिता पाटील यांच्याशी संपर्क साधला. वनिता पाटील यांनी डोंगरगावमधील पारधी महिलांची बँक खाती उघडण्यासंदर्भात गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी सविस्तर सांगितल्या. 

मग अर्ज व इतर डॉक्युमेंट्स का स्वीकारले?

आता जरी बँकेचे अधिकारी डोंगरगाव आमच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे कारण पुढे करत असले, तर गेल्या काही दिवसात दोन वेळेला बँकेने गावात कॅम्प उघडून महिलांचे खाते उघडण्यासंदर्भात अर्ज व इतर डॉक्युमेंट्स का स्वीकारले, असा प्रश्न वनिता पाटील यांनी उपस्थित केला. महिलांच्या स्वच्छता आणि अस्वच्छतेचा मुद्दा पुढे करून त्यांना बँक खाते नाकारल्याची ही माझ्या आयुष्यातील पहिलीच घटना असल्याची प्रतिक्रिया आहे वनिता पाटील यांनी दिली. 

Continues below advertisement

या संदर्भात नेमकं काय घडलं?

  • डोंगरगावमधील पारधी महिलांचे बँक खाते उघडायचे आहे हे पहिल्याच दिवशी बँक अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर सुरुवातीला त्यांनी होकार दर्शविला. 
  • यानंतर सर्वांचे अर्ज भरून घेतले.
  • खातं उघडण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्सची पूर्तता करण्यासाठी बँकेकडून दोनवेळेला गावात कॅम्प भरवण्यात आले. 
  • बँकेनं गावात लावलेल्या या कॅम्पमध्ये भर पावसात उभं राहून महिलांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करत अर्ज सादर केले.
  • त्यानंतर अचानक बँक अधिकाऱ्यांनी खाते उघडून देण्यास नकार दिला.
  • बँकेत विचारणा केल्यावर काही कर्मचाऱ्यांनी बँक अधिकारी पारधी महिलांची अस्वच्छता, आंघोळ न करण्याची सवय आणि त्यांच्या कुटुंबातील दारू व्यवसायामुळे त्यांना बँकेत खाते उघडून देण्यास तयार नसल्याची माहिती मिळाली. 

इतर महत्वाच्या बातम्या