एक्स्प्लोर

Nagpur Tiger Attack: शेतात काम करताना अचानक झडप घातली अन्...; नागपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी अंत

Nagpur News: हल्ला अत्यंत भीषण स्वरूपाचा होता. महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही वेळाने इतर शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेतली.

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक (Ramtek) तालुक्यातील देवलापार परिसरात वाघाच्या हल्ल्याची आणखी एक घटना घडली असून सावरा गावाजवळ शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुक्ता जोगड्या मरसकोल्हे या दुपारच्या सुमारास शेतात काम करत असताना अचानक वाघाने (Nagpur Tiger Attack) त्यांच्यावर झडप घातल्याची माहिती समोर आली आहे. हल्ला अत्यंत भीषण स्वरूपाचा होता. महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही वेळाने इतर शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेतली.(Nagpur Tiger Attack)

देवलापार आणि आसपासच्या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून वाघाच्या हालचाली वाढल्याच्या तक्रारी होत होत्या. शेताच्या बांधावर पायांचे ठसे, जनावरांवर हल्ल्याच्या घटना यामुळे नागरिकांमध्ये आधीच भीती होती. या ताज्या घटनेनंतर दहशतीचे सावट आणखी गडद झाले आहे.घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येत असून परिसरात कॅमेरे लावणे, पिंजरे उभारणे आणि गस्त वाढविणे यांसारख्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती आहे.(Nagpur Tiger Attack)

दरम्यान, ग्रामस्थांनी वन विभागाकडून तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना सकाळ-संध्याकाळ शेतात जाणे धोकादायक बनले असून कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना, भरपाईची तत्काळ घोषणा आणि वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

शेतात काम करताना हल्ला

मुक्ता जोगड्या मरसकोल्हे या काल दुपारी अंदाजे शेतात काम करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घातल्याची माहिती समोर आली आहे. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेतली. देवलापार आणि आसपासच्या भागात मागील काही दिवसांपासून वाघाच्या हालचाली वाढल्या असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण होते. या ताज्या घटनेनंतर परिसरात दहशतीचे सावट आणखी गडद झाले आहे. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, नागरिकांनी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

जरांगे पाटील हे माझे भाऊ, मी त्यांना घरी जेवायला यायचे निमंत्रण देते, अमृता फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
जरांगे पाटील हे माझे भाऊ, मी त्यांना घरी जेवायला यायचे निमंत्रण देते, अमृता फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Gadchiroli News: नक्षल चळवळीचा मास्टरमाईंडची थेट गोंडवाना विद्यापीठात मार्गदर्शक म्हणून वर्णी; टीकेची झोड उठताच भूपतीच्या नियुक्तीवर कुलगुरूंचा खुलासा, म्हणाले...
नक्षल चळवळीचा मास्टरमाईंडची थेट गोंडवाना विद्यापीठात मार्गदर्शक म्हणून वर्णी; टीकेची झोड उठताच भूपतीच्या नियुक्तीवर कुलगुरूंचा खुलासा, म्हणाले...
Rohit Pawar on Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
Pune Nagpur Dj : नियमांचे उल्लंघन, कायद्याचा वचक; पुण्यात 10 दहीहंडी मंडळांवर गुन्हे. तर 116 मंडळांवर न्यायालयीन खटले, नागपुरातही ध्वनिप्रदूषणप्रकरणी तीन गुन्हे दाखल
नियमांचे उल्लंघन, कायद्याचा वचक; पुण्यात 10 दहीहंडी मंडळांवर गुन्हे. तर 116 मंडळांवर न्यायालयीन खटले, नागपुरातही ध्वनिप्रदूषणप्रकरणी तीन गुन्हे दाखल

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
Embed widget