Vidarbha School News :  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षण विभागाचा यापूर्वीचा 28 मार्च आणि 9 जून चा आदेश रद्द केला आहे. त्यामुळं आता विदर्भातील शाळा (Vidarbha School) 30 जून रोजीच सुरु होणार आहेत. शिक्षण विभागाने 28 मार्च रोजी आदेश काढत महाराष्ट्रातील विदर्भासह सर्व शाळा 15 जून रोजी सुरु होतील असे निर्देश दिले होते. त्यासंदर्भात विदर्भातील शिक्षक संघटना आणि पालकांनी 15 जून रोजी तापमान म्हणावं तेवढं कमी होत नाही अशी ओरड केली होती. आधीपासूनच विदर्भातील शाळांसाठी 26 जून ची तारीख निश्चित असल्यामुळे शिक्षण विभागाच्या 28 मार्च चे आदेशाला विरोध दर्शविला होता. यासंदर्भात काही संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठातही गेल्या होत्या.

Continues below advertisement

नागपूर खंडपीठाने शिक्षण विभागाला चांगलेच सुनावले 

दरम्यान, काल म्हणजेच 9 जून रोजी शिक्षण विभागाने सुधारित आदेश काढत विदर्भातील शाळा 15 जून रोजी 22 जून पासून सुरू होतील आणि 22 जून ते 30 जून दरम्यान सकाळच्या 17 शाळा भरवल्या जातील असे सुधारित आदेश काढले होते. मात्र आज नागपूर खंडपीठात सुनावणी झाल्यानंतर खंडपीठाने शिक्षण विभागाला चांगलेच सुनावले आणि विदर्भातील शाळा संदर्भात आधीच 26 जून ची तारीख निश्चित असताना नवनवीन आदेश काढून गोंधळ का वाढवला जातो असे खडसावले. आता नागपूर खंडपीठाने विदर्भातील शाळांसाठी 30 जून ची तारीख निश्चित केली आहे. शिक्षण विभाग आणि त्यांचे अधिकाऱ्यांनी शाळांच्या सुरू होण्यासंदर्भात यापूर्वीच्या जीआर च्या विरोधात जाऊन कृती करू नये असेही बजावले आहे.

तापमानाचा संभाव्य धोका विचारात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय

विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी व नियमित शाळा सुरू करण्याबाबत बदल करण्यात आला आहे. तापमानाचा संभाव्य धोका विचारात घेऊन विदर्भात दि. ३० जून २०२६ दरम्यान विदर्भातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरतील. त्यानंतर 1 जुलै 2026  पासून शाळा नियमित वेळेत भरतील, असे कळविण्यात आले आहे. सदरचे परिपत्रक माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर आणि प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. शरद गोसावी यांनी काढले आहे.

Continues below advertisement

विदर्भात मान्सून पोहोचण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी

विदर्भात मान्सून पोहोचण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. परिणामी विदर्भातील तापमान विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे केवळ विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा 30 जूनपासून सुरू होतील.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI