नागपूर : 1 ऑगस्ट 2022 पासून मालमत्तेच्या बाजारमूल्य निर्धारण अर्थात अभिनिर्णय प्रकरण ऑन-लाईनद्वारे जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात सादर करावे, असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हार्डीकर यांनी केले. याशिवाय मुद्रांक शुल्क माफीच्या प्रकरणातील अभिनिर्णय ऑन-लाईन सादर करण्याचे आवाहन आहे. पक्षकारांना होणारा त्रास व अडचणींना समोर जावे लागत असल्याकारनाने आणि प्रत्येक कामकाजामध्ये अद्यावत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन कामकाज अधिक पारदर्शक, गतीमान व लोकाभिमुख करण्याकरिता ई-अभिनिर्णय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
प्रत्यक्षपणे अभिनिर्णयाचा कुठलाही दस्त स्विकारणार नाही
मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात प्रत्यक्षपणे अभिनिर्णयाचा कुठलाही दस्त स्विकारणार नाही, ऑन-लाईन अभिनिर्णयाचा अर्जाचा (online Adjudication Application) चा वापर बंधनकारक आहे., प्रणाली विभागाच्या लिंक www.igrmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे., ज्या नागरिकांना ऑन-लाईन अर्ज करणे जमणार नाही त्यांनी संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या सहाय्याने ऑन-लाईन अर्ज सादर करावा., सदरअभिनिर्णय अर्ज दाखल केल्यानंतर मिळणाऱ्या पोहचची प्रत घेतल्यानंतर त्या अर्जावर अभिनिर्णय सांकेतांक नमूद करावा. मुळ कागदपत्रे व अभिनिर्णय अर्ज प्रत्यक्षरित्या संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात 30 दिवसाचा आत सादर करावा. त्यानंतर सादर ऑन-लाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा नव्याने अर्ज करणे आवश्यक असेल., या प्रणालीमध्ये त्रृटी व इतर बाबींचा पत्रव्यवहार, नोटीस, आदेश ऑनलाईन प्राप्त होतील. कृपया आपला ई-मेल आय.डी.पुरविण्यात यावा., ऑनलाईन अभिनिर्णय अर्ज कार्यालयीन वेळेतच दाखल करणे बंधनकारक राहील.
येथे करा तक्रार
योजनेबाबत अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाचे कॉल सेंटर क्रं.8888007777 व ई-मेल आय.डी. complaint@igrmaharashtra.gov.in यावर संपर्क साधावा.