Sayaji Shinde : महाराष्ट्रात वृक्षारोपणासाठी परवानगीची गरज का? वृक्ष लागवडीसाठी कायद्याचे बंधन कशाला? वन जमिनीवरील झालेले अतिक्रमण वन विभागाला (Forest Department) दिसत नाही का? असा उद्विग्न प्रश्न प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि 'सह्याद्री देवराई फाऊंडेशन' (Sahyadri Devrai Foundation) चे प्रमुख सयाजी शिंदे यांनीप्रशासनालाविचारातआपलीनाराजीव्यक्तकेली आहे. पश्चिम महाराष्ट्रसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात 'सह्याद्री देवराई फाउंडेशन'च्या माध्यमातून वृक्षारोपणाच्या (Devrai Project) क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या सयाजी शिंदे यांनी आता पूर्व विदर्भात काम सुरू केले आहे. नागपूर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी त्यांच्या सोबत काम करण्याची इच्छा दर्शवत गावालगत देवराईसाठी प्रस्ताव सादर केले आहे. मात्र, वन विभागाचे अधिकारी त्यामध्ये कायद्याचा अतिरेकी आग्रह करून अडचणी निर्माण करत असल्याचा सयाजी शिंदे यांचा आरोप आहे.(Sayaji Shinde on Forest Department)

Continues below advertisement

Sayaji Shinde : वनविभाग सांगतआलेल्या राखीव वनक्षेत्रातएकही कुठलेही झाड नाही, उलट अतिक्रमण

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील 'बेला' ग्रामपंचायतीने त्यांच्या गावालगत सयाजी शिंदे यांच्या फाउंडेशन सोबत मिळून सह्याद्री देवराईसाठी वन विभागाकडे जागेची मागणी केली आहे. मात्र बेला ग्रामपंचायत आणि सह्याद्री देवराई फाऊंडेशनने मागितलेली जागा देण्यास वन विभागाने नकार दर्शविला आहे. मागितलेली जागा राखीव वनक्षेत्र असल्याने ती देवराईसाठी देता येऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी वृक्षारोपणाची परवानगी ही देता येणार नाही, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, ज्या जागेला वनविभाग राखीव वनक्षेत्र सांगत आहे. त्या ठिकाणी कुठलेही झाड नाही. उलट त्या जागेवर काही जणांनी अतिक्रमण करून नियमबाह्य पद्धतीने शेती सुरू केली असल्याचं सयाजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आरोप आहे.

Continues below advertisement

Sayaji Shinde : सयाजी शिंदे यांचं देवेंद्र फडणवीस यांनापत्र, मुख्यमंत्र्यांकडून राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, पण...

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावर सयाजी शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत महाराष्ट्रात देवराईसाठी वन विभागाच्या सहकार्याची मागणी केली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून सयाजी शिंदे यांच्या देवराई फाऊंडेशनला नियमाप्रमाणे सहकार्य करण्याचे निर्देश देणारं पत्र दिलंहोतं. त्यामुळे नियमांची आडकाठी करून वृक्षारोपणाचा प्रस्तावित उपक्रम वन विभागाचे अधिकारी अडवत आहे. मात्र स्वतःच्या जागेवरील अतिक्रमणाची त्यांना फिकीर नाही, असा सयाजी शिंदे यांचा आरोप आहे.

इतर महत्वाच्या बातम्या