Samruddhi Highway : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway)  प्रवाशांसाठी खुला झाला त्या दिवसापासून हा महामार्ग कायम चर्चेत राहिला आहे तो यावर होणाऱ्या अपघातांमुळे. या महामार्गावर सतत होणाऱ्या आपघत रोखण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावरील मोकळ्या जागी विविधरंगी फुले, कृत्रिम दगडांच्या आकर्षक सजावट, मनमोहक पेंटिंग, इत्यादी महामार्गावर लावण्यात येत आहेत. मधल्या काळात या महामार्गावर होणारे अपघात (Samruddhi Accident) आणि त्यामागील कारण लक्ष्यात घेता ही नवी शक्कल लढविण्यात आली आहे. एमएसआरडीसीने हे काम हाती घेतले असून समृद्धी महामार्गावरील हे सुशोभीकरण प्रवाश्यांचे  लक्ष वेधत आहे.  


अपघात रोखण्यासाठी नवी शक्कल 


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाला त्या घटनेला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. समृद्धी महामार्गामुळे प्रवाशांचा नागपूर ते मुंबई दरम्यान प्रवास आधिक सुखद झाला. सोबतच प्रवाशांनी या महामार्गावरून केलेल्या विक्रमी वाहतुकीमुळे शासनाला महसुलाची देखील समृद्धी झाली आहे. असे असले तरी या महामार्गावर होणारे अपघातांमुळे हा महामार्ग कायम चर्चेत राहिला आहे. या महामार्गावर होणारे अपघात आणि त्यामागील नेमके काय कारण असावे या बाबत अभ्यास देखील करण्यात आला. या अभ्यासाअंती अनेकदा चालकाला झोप आल्याने अपघात घडले आहेत असे आढळून आले. त्यामुळे रोड हिप्नोसिस सारखे प्रकार टाळण्यासाठी एमएसआरडीसी समृद्धी महामार्गावर सुशोभीकरण करून उपायोजना करण्यात येत आहेत.


मोकळ्या जागेत आकर्षक पेंटिंग; रंगबेरंगी दगड 


समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांची मालिका रोखता यावी यासाठी काही दिवसांपूर्वी ठराविक अंतरावर विविधरंगी झेंडे लावण्यात आले. मात्र ते अल्पावधीतंच खराब झाले. त्यानंतर आता समृद्धी महामार्गावरील मोकळ्या जागेत आकर्षक पेंटिंग, विविधरंगी लिलीचे फुले, सुचनांचे फलक, भलेमोठे रंगबिरंगी दगड इत्यादि ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून रोड हिप्नोसिस सारखे प्रकार टाळता येऊ शकतील. चलकाच्या डोळ्याला विशिष्ट रंग आकर्षित करत राहतील या करीत एमएसआरडीसी कडून या उपायोजना करण्यात येत आहेत.


समृद्धी महामार्गाच्या वैभवात अजून पडणार भर


समृद्धी महामार्गावर लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम व क्रिकेट अकॅडमी तयार होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि एमएसआरडीसी मध्ये अंतिम बोलणे झाले आहे.  या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियम व क्रिकेट अकॅडमी साठी 50 एकर योग्य जागा समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टोकावर अर्थात ठाणे जिल्ह्याच्या अमाने गावाजवळ शोधण्याचं काम सुरू झाले आहे. गेल्या सहा महिने अगोदर पासूनच मुंबई क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे याबाबत बोलणी केली होती. त्यानुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनला समृद्धी महामार्गावर पन्नास एकर जमीन एमएसआरडीसी कडून 99 वर्षाच्या भाडेतत्त्वावर दिल्या जाणार असल्याची माहिती ही संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गाच्या वैभवावर अजूनही भर पडणार आहे. हे क्रिकेट स्टेडियम अतिशय भव्य दिव्य असणार असून यामध्ये क्रिकेट अकॅडमी असणार आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचीही माहिती आहे.


हे ही वाचा