Indian Science Congress News : विद्यापीठासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या पहिल्याच दिवशी गैरव्यवस्थापन आणि अनागोंदीमुळे गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (RTMNU) आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन ISCA (आयएससीए) यांचा समावेश असलेल्या आयोजकांनी दिलेल्या निकृष्ट सुविधांबाबत विद्यार्थ्यांकडून आणि अगदी माध्यमातील व्यक्तींकडूनही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रपती येतील का याबाबत शंका निर्माण झाली आहे.


शहरात इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या निमित्ताने संशोधकांच्या मेळाव्यास सुरुवात झाली. त्यामुळे इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये सर्वकाही अलौकिक असेल असेच वाटत होते. त्यामुळे अनेकांनी त्यापासून अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक कार्यक्रमाला येणारे पाहुणेही त्याच उंचीचे असणार असे वाटत होते. मात्र, आता पाच जानेवारीला होणाऱ्या महिला कॉंग्रेसच्या कार्यक्रमात टीना अंबानी येतील का याबाबत शंका आहे. 


विद्यापीठाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अनेक पाहुण्यांनी त्यांचे आमंत्रण लगेच नाकारल्यानंतर विद्यापीठाच्या उच्चपदस्थांनी गडकरींना चिल्ड्रन्स सायन्स काँग्रेसचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना मंगळवारी (3 जानेवारी) पुरातत्व विभागातील प्रदर्शन आणि संग्रहालयाचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र, त्यांनीही विद्यापीठाला नकार दिला. त्यामुळे शेवटच्या क्षणी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना प्रमुख पाहुणे बनवण्यात आले.


विद्यापीठाच्या विभागाचा एकही स्टॉल नाही; इतरांकडून घेतले पैसे 


विद्यापीठामध्ये लावण्यात आलेल्या स्टालमध्ये विद्यापीठाच्या विभागाला स्थान देण्यात आले नाही. त्यासाठी खुद्द कंत्राटदाराने 13 हजार प्रती स्टॉलल मागितल्याची माहिती आहे. त्यामुळे विभागातील विद्यार्थ्यांना जागा मिळू शकली नाही. विशेष म्हणजे त्याला 23 कोटी रुपयाचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामध्ये कॅटरिंगचा देखील समावेश होता. 


नियोजन फक्त कागदावरच : दिशादर्शकांचा अभाव


विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील प्रवेशद्वाराकडून प्रदर्शनाकडे जाण्यासाठी कुठेही सूचना लिहिलेली नाही. तसेच सुरक्षा रक्षकांकडून प्रवेश करताच वाहन पार्क करण्याचा सांगण्यात येत आहे. मात्र विद्यापीठाने दिलेल्या नियोजनानुसार प्रत्येक गटासाठी वेगळी पार्किंगची व्यवस्था आहे. मात्र हे नियोजन फक्त कागदापुरतेच मर्यादित दिसत आहे. तसेच कॅम्पसमध्ये प्रवेश केल्यावर कुठल्याही सूचना किंवा दिशादर्शक दिल्या नसल्याने नेमके कुठे जावे असे प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाले होते. त्याबाबतही अभ्यागतांनी तक्रार केली. रस्ता तयार करण्यात किंवा त्यावर कार्पेट टाकण्यात आयोजकांना अपयश आले. समतोल सरफेस नसतानाही त्यावर कारपेट लावण्यात आल्याने अनेक लोक इथे पडली सुद्धा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन भाषणादरम्यानच अडचणींना सुरुवात झाली. ध्वनी प्रणाली खराब होती आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसारख्या मान्यवरांची भाषणे ऐकू येत नाहीत, असे पाहुण्यांनी सांगितले.


ही बातमी देखील वाचा...


सर्व सामान्यांसाठी खुली 'विज्ञानाची महाजत्रा'; इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये निशुल्क प्रवेश


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI