Continues below advertisement

Ravikant Tupkar Speech Nagpur : शेतकरी हे त्यांच्या स्वतःमुळे कर्जबाजारी झाले नाहीत तर सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे आणि ती मान्य झाल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही असं शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले. शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका. आमदार नव्हे तर दोन-चार मंत्र्यांना कापा, पण मागे हटू नका असंही ते म्हणाले. माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी मोठं आंदोलन (Farmers Protest) उभं केलं आहे. त्यावेळी आंदोलकांना संबोधित करताना तुपकरांनी राज्य सरकारवर टीका केली.

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांचे नागपूरमधील आक्रमक भाषण

सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडणार नाही. राज्यात जातीचा मोर्चा निघाला तर सरकार आंदोलनाच्या ठिकाणी येतं. मग आमच्या मातीच्या मोर्चाला तुम्ही का येऊ शकत नाही? आम्ही तुमच्या दारात येणार नाही, तर तुम्हाला आमच्याकडे चर्चा करायला यावं लागेल.

Continues below advertisement

सरकारने निवडणुकीच्या आधी कर्जमाफीची घोषणा केली होती. आता त्याला एक वर्ष झाले तरी त्यावर काहीच बोलत नाहीत. आम्ही काही भीक मागायला आलो नाही, तर कर्जमुक्ती ही आमची मागणी आहे. कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे.

Ravikant Tupkar Nagpur Speech : सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी

केंद्र सरकारने सोयाबीन निर्यात केली नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सोयाबीनची निर्यात केल्यास त्याला 8000 भाव मिळेल. कापूस आयातीपेक्षा कापूस निर्यात करा. आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झालं नाही तर तुमच्या धोरणांमुळे आम्ही कर्जबाजारी झालो आहे. तुम्ही कापूस, ऊस शेतकऱ्यांना लुटला आणि आम्ही कर्जबाजारी झालो. शेतकऱ्यांच्या पीकांना भाव मिळत नसल्याने मुलांची लग्नं होत नाहीत. हे एक मोठं संकट निर्माण झालं आहे.

Ravikant Tupkar Speech Today :पुढचा टप्पा मुंबईत ठेवा

नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना हाणलं ना ते मंत्री देश सोडून पळून गेले. नागपूर नंतर पुढचा टप्पा मुंबईत ठेवा. त्या नालायकांना आपण बाहेर काढू. माझ्यावर 100 केसेस दाखल आहेत. पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या छाती कमी पडणार नाहीत.

Bachchu Kadu Farmers Protest : दोन चार मंत्र्यांना कापा

आम्ही काही फक्त बोलबच्चन नाही. आम्ही जे बोलतो ते करतो. लोक म्हणतात की शेतकऱ्यांचे मजबूत संघटन होऊ शकत नाही. पण तुम्ही दाखवून दिलं की शेतकरीही एकत्र येऊ शकतात. इथून पुढे आत्महत्या करायच्या नाहीत. कितीही संकटं आली तरी जीवन संपवायचं नाही. बच्चू भाऊंनी सांगितलं की आमदाराला कापा. मी त्या पुढे जाऊन सांगतो की दोन-चार मंत्र्यांना कापा. पण आता मागे हटायचं नाही. मरायचं तर आजिबात नाही.

Nagpur Farmers Protest : कर्जमाघारी झाल्याशिवाय परत नाही

युद्धामध्ये काही झालं तर नेत्याचा आदेश शिरसावंद्य असतो. त्यामुळे इथले नेते जो काही आदेश देतील, त्याची अंमलबजावणी करा. घरी फोन करून सांगा, कर्जमाफी केल्याशिवाय माघारी येणार नाही. त्यामुळे आता सरकार कसं चर्चेला येत नाही ते आपण पाहूच. शेतकऱ्यांची एकजुट झालेली वज्रमुठ सोडू नका. इंग्रज माजले म्हणून महात्मा गांधी, भगतसिंहांचा जन्म झाला. अण्णा हजारेंनी आंदोलन केलं म्हणून केजरीवाल दोन-तीन वेळा मुख्यमंत्री झाले. आता राज्यातील सरकार माजलं म्हणून इथले नेते जन्माला आले आहेत असं समजा.

ही बातमी वाचा: