नागपूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालययाचा नाविण्यपूर्ण उपक्रम असून यामुळे क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळावे यासाठी समाजातील विविध भागधारक संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. क्षयरोगाचे समूळ उच्चाटनासाठी लोकसहभाग असणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत (National Tuberculosis Eradication Programme) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ममता सोसरे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. जिचकार, वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमलता वर्मा, जिल्हा समन्वयक विनय लोणारे, नितिन वानखेडे तसेच विविध भागधारक संस्था, कॉर्पोरेटस्,औद्योगिक व विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
सहभाग नोंदविण्यासाठी येथे करा संपर्क
क्षयरोग मुक्त नागपूर करण्यासाठी लोकसहभागातून विविध स्तरातून विविध घटकामधून सहभागाने क्षयरुग्णांना सहाय्यता करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमास या सर्व भागधारक संस्थांकडून सहाय्य मिळावेयासाठी सहभाग नोदविण्यासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देवून अथवा dtomhngr@rntcp.org या ई-मेल आयडीद्वारे निक्षयमित्र म्हणून संपर्क साधाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी केले. क्षयरोग झालेला रुग्णाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. क्षयरोग झाल्यामुळे त्यांची भूक मंदावते, जर रुग्ण जेवण न करता औषध खात असेल तर त्यास इतर आजारही होऊ शकतात. त्यामुळे त्याला पोषण व सकस आहार मिळत असेल तर तो या आजारातून लवकरच बरा होऊ शकतो. यासाठीचे नियोजन करुन ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे, अशा रुग्णाला दत्तक घेवून त्या रुग्णाचा उपचार संपेपर्यात कमीत कमी एक वर्षासाठी पोषण आहार देण्याबाबत त्या काळात त्यांना त्यांच्या क्षमता व पात्रतेनूसार रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे तसेच त्यांना त्यांच्या आजारासंबंधित वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी मदत मिळवून देण्यासाठी शासनाने हा उपक्रम जाहीर केला आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्राला सहकार्य करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील विविध कॉर्पोरेट व औद्योगिक संस्था कडील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR), प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधी, एनजीओ, सिव्हिल सोसायटी,व्यावासायिक संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, इनरव्हील क्लब व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आदींनी स्वयंप्ररेणेने क्षयरुग्णांना या उपक्रमात सहभागी करावे, असे आवाहन डॉ. ममता सोनसरे, डॉ. जिचकार, डॉ. हेमलता वर्मा, विनय लोणारे व नितिन वानखेडे यांनी केले आहे.