एक्स्प्लोर

नागपूरची त्रिशा मनालीत झिपलाईनवरुन कोसळली, सुदैवाने बचावली; व्हिडिओ दाखवत कुटुंबीयांचा संताप

नागपूरचे रहिवासी प्रफुल्ल बिजवे हे उन्हाळी सुट्टीसाठी पत्नी आणि मुलगी त्रिशासोबत मनाली येथे पर्यटनासाठी गेले होते.

नागपूर : उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून आता पावसाळ्याला सुरुवात होत आहे. पावसाळ्यापूर्वी अनेकांनी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी प्रसिद्ध पर्यटनस्थळाला भेटी दिल्या. दरम्यान, जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी आपलं पर्यंटन रद्द केल्याचंही पाहायला मिळालं. मात्र, पर्यटन आणि तेथील सुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे अनेकदा पर्यटनस्थळी (Tourist) साहसी खेळ खेळतानाही प्रवाशांच्या जीवावर बेतले जाते. पर्यटनस्थळी साहसिक खेळांमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यास काय घडते हे नागपूरच्या (Nagpur) एका मुलीसोबत मनालीत घडले आहे. अनेकदा पुरेशी सुरक्षा नसतानाही पर्यटकांकडून अतिउत्साहाच्या भरात जीवघेणा टास्क केला जातो. एका नागपूरकन्याचे बाबतीतही असंच घडलं असून मनालीत नागपूरची मुलगी त्रिशा बिजवे हिच्यासोबत अपघात घडला. झिप लाइनरवर असताना बेल्ट तुटल्याने त्रिशा 30 फूट खाली पडली. या अपघातामध्ये तिच्या पायाला अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. आता, तिच्या कुटुंबाने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, येथील पर्यटनस्थळी पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

नागपूरचे रहिवासी प्रफुल्ल बिजवे हे उन्हाळी सुट्टीसाठी पत्नी आणि मुलगी त्रिशासोबत मनाली येथे पर्यटनासाठी गेले होते. रविवार 8 जून रोजी त्रिशा झिप लाइनरवर असताना, ती ज्या बेल्टने झीप लायनरवर लटकली होती अचानक तो बेल्ट तुटल्याने अपघात झाला. या अपघातात त्रिशा 30 फूट उंचीवरून खाली पडली. या दुर्घटनेत त्रिशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्या पायाला अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. सुदैवाने झीपलाईन ही जास्त उंचीची नसल्याने आणि त्रिशा उतरत्या स्पॉटजवळ आल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, त्रिशाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिच्या कुटुंबीयांना झिपलाईनर व्यवस्थेवर संताप व्यक्त केला आहे. 

दरम्यान, या दुर्घटनेबाबत बोलताना त्रिदशाच्या कुटुंबाने म्हटले की, तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. आमच्या कुटुंबाला तिथे कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे, त्रिशावर सुरुवातीला मनाली, नंतर चंदीगडमध्ये उपचार करण्यात आले. सध्या त्रिशावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेतून प्रत्येकानं धडा घ्यायला हवा. पर्यटनस्थळी साहसिक खेळांसाठी मैदानात उतरताना पुरेशी व्यवस्था आहे का हे तपासायला हवे. तसेच, तेथील सुरक्षा व्यवस्था आणि धोके लक्षात घेऊनच साहसिक खेळ खेळावे. अन्यथा काहीवेळा हे साहस जीवावर बेतण्याची शक्यता असते. 

हेही वाचा

माजी नगरसेविकेच्या वकिल लेकीने 10 जणांचं टोळकं आणलं, तरुणाला घरासमोरच जबर मारहाण; पोलिसांनी पाठीशी घातलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञांचा खरेदीबाबत सल्ला
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Row : मोहोळ Vs धंगेकर वादानंतर Jain Boarding पुन्हा सुरू Special Report
Murlidhar Mohol - Ajit Pawar : ऑलिंपिक असोसिएशन निवडणूक तिढा अखेर सुटला,अजितदादांची एकमुखानं निवड
Leopard Attack: शिरूरमध्ये 13 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा उद्रेक, वनविभागाची गाडी पेटवली
Mahayuti Special Reportराष्ट्रवादी शरद पवारांची,शिवसेना ठाकरेंची,पाटलांच्या वक्तव्याने राजकारण तापलं
Uddhav Thackeray Marathwada Tour: ठाकरेंचा मराठवाड्यात 4 दिवस दगाबाजरे संवाद दौरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञांचा खरेदीबाबत सल्ला
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget